Team My Pune City –शहरातील विविध जलशुद्धीकरण केंद्रे, पाण्याच्या टाक्या आणि पंपिंग स्टेशन येथे विद्युत तसेच स्थापत्यविषयक देखभाल-दुरुस्तीची( Pune Water Supply) कामे करण्यासाठी गुरुवार, ९ ऑक्टोबर रोजी पुण्यातील पाणीपुरवठा पूर्णपणे बंद राहणार आहे. या कामांमुळे पुढील दिवशी, शुक्रवार १० ऑक्टोबरला, सकाळी उशीरा आणि कमी दाबाने पाणीपुरवठा होणार असल्याची माहिती महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागाने दिली आहे.
महापालिकेचे नवीन व जुने पर्वती जलशुद्धीकरण केंद्र, पर्वती एमएलआर, एचएलआर आणि एसएलआर टाकी परिसर, एस.एन.डी.टी. एमएलआर व एचएलआर टाकी परिसर, चतुश्रुंगी टाकी परिसर, पर्वती टँकर पॉईंट, तसेच लष्कर, होळकर, चिखली आणि वारजे जलकेंद्र, खडकवासला( Pune Water Supply) जॅकवेल, वारजे फेज क्रमांक १ व २, गांधी भवन टाकी परिसर, पॅनकार्ड क्लब जीएसआर टाकी परिसर, गणपती माथा आणि जुने वारजे जलकेंद्र येथे विद्युत पंपिंग व वितरण व्यवस्थेची तातडीची देखभाल केली जाणार आहे.
Talegaon School Attack : शाळकरी मुलांच्या भांडणात धारदार शस्त्राने वार
या संदर्भात महावितरणच्या वारजे विभागातील अतिरिक्त कार्यकारी अभियंत्यांनी महापालिकेला पत्राद्वारे कळविले असून, नागरिकांनी या काळात पाण्याचा वापर काटकसरीने करण्याचे आवाहन पाणीपुरवठा विभागाने केले ( Pune Water Supply) आहे.