situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर -समर नखाते

Published On:

Team MyPuneCity -फिल्म इंडस्ट्रीतील करिअरबद्दल समाजात भाबड्या, भ्रामक आणि भयाण कल्पना पसरलेल्या आहेत. या क्षेत्रात करिअर म्हणजे भरपूर पैसा आणि लोकांनी ‌‘लय भारी‌’ म्हणणे असे नसून तुमच्यातील कौशल्य अधिक समृद्ध होत तुमचे अस्तित्व व्यापक पातळीवर काही देऊ असणारे पाहिजे. थोडक्यात व्यापक अभिसरण, मुक्त व्यवहारातून करिअर घडत असते. मूल्यात्मक व्यापक समाजकल्याण व्यवस्था म्हणजे खरे करिअर होय, असे प्रतिपादन ज्येष्ठ चित्रपट प्रशिक्षक समर नखाते यांनी केले. ‌‘कॅमेरा इज द डेडलिएस्ट वेपन‌’ अशी टिप्पणीही त्यांनी केली.

संवाद, पुणे, हाऊस ऑफ सक्सेस, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍, पुणे मॅनेजमेंट असोसिएशन आणि पुणे विद्यार्थी गृह यांच्या संयुक्त विद्यमाने ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावरील प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे शिवाजीनगरमधील बालगंधर्व कला दालन येथे आयोजन करण्यात आले आहे. तिसऱ्या दिवसाची (दि. 15) सुरुवात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘फिल्म इंडस्ट्री, ग्लॅमर, करियर आणि बरंच काही‌’ या विषयावर समर नखाते यांच्या मुलाखतीने झाली. त्यांच्याशी लेखक, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी यांनी संवाद साधला.

कलेबद्दल बोलताना समर नखाते पुढे म्हणाले, कलेची गरज आहे का, कला कशाला म्हणायचे हे मुद्दे समजून घेणे महत्त्वाचे आहे. कलेत पैसा गृहित धरलेला आहेच. कलेची जोपासना करणारी मानसिकता असलेली शिक्षण संस्था असणे अत्यंत आवश्यक आहे. संस्थात्मक पातळीवर जसे कलेला समृद्ध करायचे असते तसेच कलेचे कौटुंबिक पातळीवरही अभिसरण होणे आवश्यक आहे. व्यापक सामाजिक चलनाचा व्यवहार म्हणजे करिअर होय. चुका करायची भीती वाटू देऊ नका. कला सादर करणाऱ्याने आणि बघणाऱ्यानेही सातत्याने रियाज करायला हवा, असा सल्लाही त्यांनी दिला.

Pune: संगीत क्षेत्रात आज करिअरच्या मुबलक संधी उपलब्ध

समाजमन बदलत गेल्याच्या जाणिवा शिक्षण संस्थांनी देखील समजून घेणे आवश्यक आहे. त्यानुसार अभ्यासक्रम, गुणवत्ता, उत्तम शिक्षक याविषयी शिक्षण संस्थांनी भान ठेवले पाहिजे. सध्या फिल्म इंडस्ट्रीसह सर्वच क्षेत्रात एक्सलन्सची डिमांड नसणारा समाज निर्माण होत आहे. त्यामुळे हौशे, नवशे, गवशे यावर समाज विसंबून रहात आहे. परंतु समाज हा गुणग्राहक असणे आवश्यक असल्याचे नखाते म्हणाले. ते पुढे म्हणाले, सामान्यातून असामान्यत्वाकडे जातांना मानवी भावनांना उचलले जाते त्याला ओलांडून जाते ती खरी कला होय. आज आपल्याला चांगल्या-समंजस कलेला न्याय देणाऱ्या, साकार करणाऱ्या पिढ्या घडविण्याचे आव्हान आहे.

प्रास्ताविक प्रसाद मिरासदार यांनी तर स्वागत सुनील महाजन यांनी केले.

Follow Us On