Team My Pune City –नगर रस्त्यावरील वाडेबोल्हाई परिसरात लक्ष्मीपूजनाच्या दिवशीच(Pune) मोठ्या चोरीची घटना उघडकीस आली आहे.पूजेसाठी देवघरात मांडलेले सोन्याचे दागिने आणि रोकड असा तब्बल १९ लाख ८८ हजार रुपयांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केला आहे. या प्रकरणी अमोल काशीनाथ गावडे (वय ३७, रा. वाडेबोल्हाई) यांनी लोणीकंद पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी गावडे यांचा वाडेबोल्हाई–राहू रस्त्यावर बंगला आहे. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही त्यांनी २१ ऑक्टोबर रोजी लक्ष्मीपूजनाचा विधी मोठ्या थाटामाटात केला होता. पूजा सायंकाळी पार पडल्यावर, देवघरात सोन्याचे दागिने आणि रोकड मांडून ठेवण्यात आले होते. प्रथेनुसार दुसऱ्या दिवशी सकाळी हा ऐवज कपाटात ठेवायचा होता.
मात्र मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी स्वयंपाकघराच्या खिडकीची जाळी उचकटून घरात प्रवेश केला. त्यानंतर देवघरातील सोन्याचे दागिने व रोकड असा जवळपास १९ लाख ८८ हजार रुपयांचा मुद्देमाल घेऊन चोरटे फरार झाले. सकाळी पूजा आवरण्यासाठी कुटुंबीय देवघरात गेले असता चोरीचा प्रकार उघडकीस आला.
घटनेची माहिती मिळताच लोणीकंद पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पंचनामा करून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून, चोरट्यांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
Nakul Bhoir Murder : घरगुती कलहातून सामाजिक कार्यकर्ता नकुल भोईर यांचा पत्नीने केला खून
Sharad Ponkshe: सद्य परिस्थितीत भाजपशिवाय देशाला पर्याय नाही,द्या किती शिव्या द्यायच्यात त्या…” -शरद पोंक्षे
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी अशा प्रकारची चोरी झाल्याने परिसरात खळबळ उडाली असून, नागरिकांमध्ये सुरक्षा व्यवस्थेबद्दल चिंतेचे वातावरण निर्माण झाले आहे.



















