Team My Pune City – शहरात चोरलेल्या मोटारीचा ( Pune Theft News) वापर करून घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या सराईत चोरट्याला गुन्हे शाखेच्या युनिट सहाच्या पथकाने अटक केली आहे. या कारवाईत पोलिसांनी दागिने आणि मोटार असा एकूण 21 लाख 40 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. विशेष म्हणजे, या आरोपीविरुद्ध यापूर्वीच ‘मकोका’अंतर्गत कारवाई करण्यात आली होती. न्यायालयातून जामीन मिळाल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीकडे वळल्याचे तपासात समोर आले आहे.
अटक केलेल्या चोरट्याचे नाव बिरजू राजपूतसिंग दुधानी (वय ४०, रा. रामटेकडी, हडपसर) असे आहे. त्याच्याविरुद्ध येरवडा, चिखली, भोसरी एमआयडीसी आणि संत तुकारामनगर पोलिस ठाण्यात अनेक घरफोडीचे गुन्हे नोंद ( Pune Theft News) आहेत.
गुन्हे शाखेचे पथक रविवारी (दि. 12 ऑक्टोबर) खराडी परिसरात नियमित गस्त घालत असताना, दुधानी हा चोरलेल्या मोटारीतून फिरत असल्याची आणि तो घरफोडीचे गुन्हे करीत असल्याची माहिती पोलिस कर्मचारी नितीन मुंढे आणि कानिफनाथ कारखेले यांना मिळाली. पथकाने तत्काळ सापळा लावून त्याला ताब्यात घेतले. तपासादरम्यान पोलिसांना आढळले की, तो ज्या मोटारीतून फिरत होता त्या वाहनावर क्रमांक प्लेटच नव्हती. त्याच्याकडून सोन्याचे दागिने आणि मोटार असा एकूण रु. 21 लाख 40 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला ( Pune Theft News) आहे.
Maval: मावळ पंचायत समितीचे आरक्षण जाहीर
या कारवाईत पोलीस उपायुक्त निखिल पिंगळे आणि सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक वाहिद पठाण, सहायक निरीक्षक राकेश कदम, मदान कांबळे, नितीन मुंढे, कानिफनाथ कारखेले, बाळासाहेब सकटे, सारंग दळे, प्रशांत कापुरे, नीलेश साळवे, नेहा तापकीर, ऋषीकेश व्यवहारे, प्रतीक्षा पानसरे, कीर्ती मांदळे आणि सोनाली नरवडे यांनी ही यशस्वी कामगिरी केली.
पोलिसांच्या मते, दुधानी हा सराईत गुन्हेगार असून त्याने यापूर्वी केलेल्या गुन्ह्यांमुळे त्याच्यावर ‘मकोका’ अंतर्गत कारवाई झाली होती. मात्र, जामिनावर सुटल्यानंतर त्याने पुन्हा गुन्हेगारीकडे वळून घरफोडींच्या मालिकेला सुरुवात केली होती. गुन्हे शाखेच्या तात्काळ आणि अचूक कारवाईमुळे या सराईत गुन्हेगाराला थोपवण्यात पोलिसांना यश आले ( Pune Theft News) आहे.