situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune:रागसंगीत आणि सुगमसंगीताच्या स्वरांनी रंगली सायंकाळ

Published On:
---Advertisement---

डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे यांना कै. पंडित अप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादक पुरस्कार प्रदान

Team MyPuneCity –गानवर्धन संस्थतर्फे प्रसिद्ध संवादिनीवादक पं. अप्पासाहेब जळगावकर यांच्या जन्मशताब्दी निमित्त आयोजित ‘सन्मान सुरांचा’ या मैफलीत प्रसिद्ध संवादिनी वादक डॉ. उपेंद्र सहस्त्रबुद्धे यांचा ‘कै. पंडित अप्पासाहेब जळगावकर संवादिनी वादक पुरस्कार’ देऊन सन्मान करण्यात आला.

बेडेकर गणपती मंदिर, कोथरूड येथे शनिवारी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पुरस्काराचे वितरण कार्यक्रमाचे अध्यक्ष विख्यात व्हायोलिनवादक पंडित अतुलकुमार उपाध्ये यांच्या हस्ते झाले. गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर, हनुमंत फडतरे, डॉ. विद्या गोखले मंचावर होते. शाल, सन्मानचिन्ह आणि रुपये दहा हजार असे या पुरस्काराचे स्वरूप होते. आपल्याला मिळालेली पुरस्काराची रक्कम त्यामध्ये तेवढ्याच रकमेची भर घालून मी गानवर्धन संस्थेस देणगी देत आहे, असे पुरस्कारार्थी सहस्त्रबुद्धे यांनी जाहीर केले.

अप्पासाहेब जळगावकर यांचे यंदाचे जन्मशताब्दी वर्ष आहे. संवादिनी वादनाचा प्रचार आणि प्रसार करण्यासाठी मोलाचे योगदान देणाऱ्या अप्पासाहेब जळगावकर यांच्या शिष्याचा त्यांच्याच नावाने दिल्या जाणाऱ्या पुरस्काराने गौरव करण्यात येतो. व्यवसायाने इंजिनिअर असलेल्या सहस्रबुद्धे यांनी संगीतात अप्पासाहेबांच्या वादन शैलीवर पीएचडी केली आहे, असे गानवर्धनचे अध्यक्ष दयानंद घोटकर प्रास्ताविक सांगितले.

सत्काराला उ्त्तर देताना डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे म्हणाले, ‘अप्पासाहेबांकडे मी २१ वर्षे तालीम घेतली. त्यांनी सगळ्याच शिष्यांना भरभरून दिले आहे. आज आंतरराष्ट्रीय संगीत दिवस, पुण्यात पालखीचे आगमन, अप्पासाहेबांचे जन्मशताब्दी वर्ष असे योग जुळून आले असताना हा पुरस्कार मला मिळतो आहे याचा आनंद आहे’.

अतुलकुमार उपाध्ये म्हणाले, सहस्रबुद्धे यांनी करिअर सांभाळून कला जपत संगीताला वाहून घेतले आहे. गायकाची गायिकी पचवून त्याला सावलीसारखे सोबत करत, गाणाऱ्याशी एकरूप होऊन गाणे फुलवण्याचे काम संवादिनी वादक करत असतात.

पुरस्कार वितरणानंतर डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे यांचे एकल संवादिनी वादन झाले. आपल्या संवादिनी वादनातू त्यांनी वाद्यसंगीतात अवघड वाटणारे भाव प्रकटीकरण केले. त्यांच्या वादनाला रसिकांनी भरभरून दाद दिली. राग कलावतीच्या पारंपरिक बंदिशीने त्यांनी वादनाची सुरुवात केली. त्यानंतर दोन स्वरचित द्रुत बंदिशी तसेच संत चोखामेळा यांचा ‘अबिर गुलाल उधळीत रंग’ या अभंगाचे सुरेल संवादिनी वादन करून त्यांनी रसिकांची मने जिंकली. त्यांना प्रसिद्ध तबलावादक अमित जोशी यांनी तबल्यावर तर रमेश सोहनी यांनी टाळावर साथसंगत केली.

त्यानंतर कै. वीणा सहस्रबुद्धे यांच्या शिष्या युवा गायिका सानिका कुलकर्णी यांच्या शास्त्रीय संगीताची मैफिल रंगली. गायनाची सुरुवात राग यमनच्या ‘देहो दान मोहे’ या कुमार गंधर्व रचित आणि ‘एरी आली पिया बिन या’ पारंपरिक बंदिशीने केली. त्यानंतर ‘अवधूता युगन्‌ युगन्‌ हम योगी’ या संत कबीर रचित दोह्याने गायनाची सांगता केली. रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहत या मैफिलीचा आनंद घेतला.

डॉ. उपेंद्र सहस्रबुद्धे (संवादिनी), अमित जोशी (तबला), आकांक्षा देशपांडे (तानपुरा) यांनी समर्पक साथसंगत केली. सूत्रसंचालन डॉ. राजश्री महाजनी यांनी केले.

Follow Us On