Team My Pune City –कलवड वस्तीतील खेसे कॉर्नर परिसराततीन गुंडांनी दहशत माजवत तरुणावर कोयत्याने वार केला (Pune )आणि परिसरातील रिक्षा तसेच दुचाकींचे नुकसान केल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
या प्रकरणी विनय नरेश अगरवाल (वय 34, रा. नागपूर चाळ, येरवडा) यांनी विमानतळ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी गणप्या (रा. कलवड वस्ती), जोशवा विल्सन रत्नम (रा. विकासनगर, कलवड वस्ती) आणि आयान शेख (रा. कलवड वस्ती) या तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 29 ऑक्टोबरच्या रात्री साडेअकराच्या सुमारास विनय अगरवाल हे त्यांचा भाऊ हर्ष याच्या सोबत मोटारसायकलवरुन पेट्रोल भरण्यासाठी लोहगाव येथील साठे वस्तीतील पेट्रोल पंपावर जात होते. कलवड वस्ती येथील खेसे पार्क कॉर्नरवरील इस्टरलिया सोसायटीसमोर तीन मुले शिवीगाळ करुन धमकी देत त्यांच्या अंगावर आली.
Rohit Arya : पवईत थरार : १७ शाळकरी मुलांना ओलीस ठेवणाऱ्या रोहित आर्यचा पोलिस एन्काऊंट
Run for Unity : ‘रन फॉर युनिटी’मधून राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश
त्यांच्यातील गणप्या याने त्याच्याकडील कोयता विनय अगरवाल यांच्या हातावर मारुन जखमी केले. आम्ही इथले भाई आहोत, आम्ही सगळ्यांना मारुन टाकू असे ओरडत दहशत पसरवली. कलवड वस्ती येथे पार्क केलेल्या तीन रिक्षाच्या काचा कोयत्याने फोडून टाकल्या. ५ दुचाकी गाड्या खाली पाडून त्यांचे नुकसान करुन दहशत निर्माण केली.
सहायक पोलीस निरीक्षक शिंदे तपास करीत आहेत.





















