Team MyPuneCity – पुणे शहरातील येरवडा भागातील तारकेश्वर पुलावरून (येरवडा बाजूकडून कोरेगाव पार्ककडे जाणारा मार्ग) प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी महत्त्वाची सूचना आहे. या पुलावरील एक एक्सपान्शन जॉईंट खराब झाल्यामुळे पुणे महानगरपालिकेमार्फत दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे.
सध्या या ठिकाणी काँक्रिट टाकण्यात आले असून, ते पूर्णपणे सेट होण्यासाठी सुमारे तीन दिवसांचा कालावधी लागणार आहे. त्यामुळे, वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि नागरिकांची गैरसोय कमी करण्यासाठी, येत्या दिनांक ०९ मे २०२५ ते दिनांक ११ मे २०२५ या कालावधीत नागरिकांनी तारकेश्वर पुलाचा वापर टाळावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
IPL Match : भारत-पाक युद्धाच्या पार्श्वभूमीवर आयपीएल स्थगित
पुणे महानगरपालिकेने नागरिकांना विनंती केली आहे की, या कालावधीत त्यांनी इच्छित स्थळी पोहोचण्यासाठी पर्यायी मार्गांचा अवलंब करावा. यामुळे दुरुस्तीचे काम सुरळीतपणे पूर्ण होईल आणि नागरिकांचा प्रवासही सुकर होईल.
नागरिकांनी या सूचनेची नोंद घ्यावी आणि सहकार्य करावे, असे आवाहन पुणे महानगरपालिकेतर्फे करण्यात आले आहे.