situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: नाट्यपदे, बंदिशी अन् आठवणीमधून उलगडले स्वरराज छोटा गंधर्व

Published On:

Team My Pune City –गाजलेली नाट्यपदे, बंदिशी, ठुमरी यांच्यासह अनेक(Pune) किस्से आणि आठवणींमधून उलगडला स्वरराज छोटा गंधर्व यांचा जीवनप्रवास.

निमित्त होते शशांक चांदोरकर आणि उदय चांदोरकर आयोजित स्वरराज छोटा गंधर्व यांची गायकी उलगडणाऱ्या अनोख्या कार्यक्रमाचे. कार्यक्रम श्री गणेश हॉल, न्यू इंग्लिश स्कूल आवार, टिळक रोड येथे आयोजित करण्यात आला होता. स्वरराज छोटा गंधर्व यांच्या शिष्या सुचेता अवचट यांनी नाट्यगीते, ठुमरी, दादरा, बंदिशी तर उदय चांदोरकर यांनी नाट्यगीते, अभंग सादर केले. स्वरराज छोटा गंधर्व यांच्या गायकीची झलक दर्शविणारे काही क्षण रसिकांना दृक्‌श्राव्य माध्यमातून अनुभवता आले.

Pawana Dam: पवना धरण शंभर टक्के भरले; 24 तासात 2 टक्के वाढ

Pune Rain Update : पुणे जिल्ह्यातील  4 ही धरणे सरासरी 96 टक्कांवर, पाणीसाठा वाढत असल्याने नदीकाठच्या नागरिकांना सतर्कतेचा इशारा 

स्वरराज छोटा गंधर्व यांचे शिष्य मनोहर चांदोरकर यांनी गायलेल्या तोचि विश्र्वमभर, नारायण नारायण, शुरा मी वंदिले अशी स्वरराज छोटा गंधर्व यांची गाजलेली पदे दृकश्राव्य माध्यमातून ऐकायला मिळाली आणि त्या पदातून स्वरराज छोटा गंधर्व यांच्या गायकीची आठवण करून दिली.

कार्यक्रमाची सुरुवात स्वरराज छोटा गंधर्व यांनी अजरामर केलेल्या देवमाणूस या नाटकातील ‘त्रिनेत्र त्रिपुरारी’ या नांदीने झाली. सुचेता अवचट यांनी ‘बैरन रतिया कैसे आऊ’, ‘दिलरुबा मधुर हा दिलाचा’, ‘बोलू ऐसे बोले’, ‘सोहं हंस ही जाने’, ‘जान करो तुमपर कुर्बान’, ‘येतील कधी यदुवीर’, ‘शूरा मी वंदिले’ ही नाट्यपदे व बंदिशी सादर केल्या. उदय चांदोरकर यांनी ‘योगिया दुर्लभ तो म्या देखिला’ आणि संगीत सौभद्रमधील ‘प्रिये पहा’ हे सुप्रसिद्ध नाट्यपद सादर केले.

कार्यक्रमाचा समारोप स्वरराज छोटा गंधर्व यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित कार्यक्रमात त्यांनी स्वत: सादर केलेल्या ‘कोण सम तुज सांग गुरुराया’ या पदाची ध्वनीचित्रफित दाखवून करण्यात आला. स्वरराज छोटा गंधर्व यांचे लडिवाळ सूर मनात साठवत रसिकांनी या कार्यक्रमास भरभरून दाद दिली.

स्वरराज छोटा गंधर्व यांना दीर्घकाळ साथसंगत करणाऱ्या राजीव परांजपे यांनी संवादिनीवर तर स्वानंद नेने यांनी ऑर्गनवर सुमधुर साथ केली. तर तबला साथ कार्तिकस्वामी दहिफळे यांची होती.

कार्यक्रमाचे समर्पक निवेदन करताना रवींद्र खरे यांनी स्वरराजांचे गाणे बुद्धिमत्तेतून साकारलेले होते असे सांगून त्यांच्या आयुष्यातील अनेक प्रसंग आपल्या सुमधुर वाणीत गुंफत, स्वरराजांची स्वभाव वैशिष्ट्ये, त्यांना प्राप्त झालेली अमाप प्रसिद्धी अशी अनोखी शब्द गुंफण करत कार्यक्रमात रंगत आणली.

बालगंधर्वांनंतर संगीत रंगभूमीची धुरा सांभळणारे गायक नट अशा शब्दांत वर्णन करत स्वरराज छोटा गंधर्व यांचा दीर्घकाळ सहवास लाभलेल्या चारुशीला केळकर यांनी अनेक आठवणी जागवत स्वरराज छोटा गंधर्व यांच्या आध्यात्मिक, भक्तिमय रूपाचे अनोखे दर्शन घडविले. तसेच स्वरराज छोटा गंधर्व प्रतिष्ठानच्या कार्याची सविस्तर माहिती दिली.

हा कार्यक्रम म्हणजे स्वराराज छोटा गंधर्व यांसारख्या अद्वितीय गुरूंना त्यांच्या शिष्योत्तमानी वाहिलेली स्वर श्रध्दांजली होती.

Follow Us On