situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: पुणे शहरात वाहतूक पोलीस अकॅडमीची यशस्वी अंमलबजावणी; १००% पोलीस अधिकारी व अंमलदारांचे प्रशिक्षण पूर्ण

Updated On:

Team MyPuneCity – पोलीस आयुक्तांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या पुणे वाहतूक पोलीस अकॅडमी अंतर्गत, दिनांक २३ फेब्रुवारी ते १० मे या कालावधीत आयोजित १८ प्रशिक्षण सत्रांमध्ये पुणे वाहतूक शाखेतील १००% पोलीस अधिकारी व अंमलदारांना प्रशिक्षण देण्यात आले. हा उपक्रम सह पोलीस आयुक्त पुणे शहर व अपर पोलीस आयुक्त (पूर्व विभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली राबवण्यात आला.

प्रशिक्षणाची रूपरेषा व उद्दिष्टे

या प्रशिक्षणाचा उद्देश वाहन कायदे, तांत्रिक ज्ञान, सॉफ्ट स्किल्स, ई-चलन यंत्रणेचा वापर, नागरिकांशी सौजन्याने वागणूक, आपत्कालीन प्रसंगी निर्णय क्षमता व कृतीशीलता यामध्ये वाहतूक पोलिसांचे कौशल्य वृद्धिंगत करणे हा होता.

Pune: वाहनचोरांचा पर्दाफाश : दोन आरोपींकडून दोन रिक्षा व एक दुचाकी जप्त

संपूर्ण प्रशिक्षण सत्रामध्ये एकूण ६३ पोलीस अधिकारी व १०४५ पोलीस अंमलदारांनी सहभाग घेतला.

प्रशिक्षणाचे विषय व तज्ञ प्रशिक्षक

या सत्रात मान्यताप्राप्त राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय प्रशिक्षकांनी खालील प्रमुख विषयांवर मार्गदर्शन केले:

  • वाहतूक नियमन व मोटार वाहन कायदा – मनोज पाटील (अपर पोलीस आयुक्त), आर.टी.ओ. अधिकारी अनिल पंतोजी, प्रकाश जाधव, अशोक शिंदे.
  • सॉफ्ट स्किल्स व मानसोपचार – उर्मिला दीक्षित, मेघा कदम, सुरेश गोखले.
  • CPR व फर्स्ट एड – डॉ. श्याम गायकवाड (जहांगीर हॉस्पिटल).
  • ई-चलन प्रणालीचे प्रात्यक्षिक – अमित गोंजारी.
  • व्हीव्हीआयपी कॅनव्हॉय, ग्रीन कॉरिडोर, मॅन्युअल सिग्नल कार्यवाही– से.नि.स.पो.आ. विजय पळसुले, सुरेंद्र देशमुख, पोउपनि रघतवान.

सहयोगी संस्था व मान्यवरांचे सहकार्य

Weikfield Foods Pvt. Ltd चे सीईओ अश्विनी मल्होत्रा, Top Management Consortium Foundation चे अजय अगरवाल, मंजिरी गोखले (Elephant Connect) व श्री श्रीकांत पाटील यांचे विशेष सहकार्य लाभले.

प्रशिक्षणाचे फलित

या प्रशिक्षणाद्वारे पोलीस कर्मचाऱ्यांना वाहन कायद्यातील बदल, ई-चलन यंत्रणेचा वापर, जनतेशी संवादाचे तंत्र, व आपत्कालीन प्रसंगातील कृतीशील उपाय याबाबत सखोल माहिती मिळाली. सर्व प्रशिक्षणार्थींना प्रमाणपत्रही प्रदान करण्यात आले.

प्रशिक्षणामागील मुख्य आयोजक

पोलीस उप आयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक महेश बोळकोडगी, महिला पोलीस निरीक्षक रुणाल मुल्ला, पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत रघतवान व आरएसपी टीमने यशस्वीरीत्या ही शिबिर मालिका पार पाडली.

भविष्यातील नियोजन

या अकॅडमीअंतर्गत भविष्यात तांत्रिक प्रशिक्षणाची जोड दिली जाणार असून पोलीस व नागरिक यांच्यातील समन्वय वाढवण्यासाठी प्रशिक्षण व्याप्तीही वाढवण्यात येणार आहे.

Follow Us On