Team MyPuneCity – रंगत-संगत प्रतिष्ठानतर्फे दिल्या जाणाऱ्या उद्धव कानडे स्मृती पुरस्काराने प्रसिद्ध निवेदिका स्नेहल दामले यांचा गौरव केला जाणार (Pune) आहे.
PCMC : वारकऱ्यांना देण्यात येणाऱ्या सेवासुविधांमध्ये कोणतीही कमतरता राहू देऊ नका – आयुक्त शेखर सिंह
पुरस्कार वितरण सोहळा रविवार, दि.८ जून रोजी सकाळी ११ वाजता पत्रकार भवन, दुसरा मजला, नवी पेठ येथे होणार आहे. पुरस्काराचे वितरण महाराष्ट्र राज्य साहित्य संस्कृती मंडळाचे अध्यक्ष, ज्येष्ठ विचारवंत डॉ. सदानंद मोरे यांच्या हस्ते होणार असून साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ कवयित्री डॉ. संगीता बर्वे यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे, अशी माहिती रंगतसंगत प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲड. प्रमोद आडकर यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. सन्मानपत्र, शाल, श्रीफळ असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानंतर निमंत्रितांचे कविसंमेलन आयोजित करण्यात आले असून यात प्रभा सोनवणे, मृणालिनी कानिटकर जोशी, तनुजा चव्हाण, स्वप्नील पोरे, स्वाती दाढे, डॉ. मिलिंद शेंडे, चंचल काळे, सचिन हनमघर, विनायक अनिखिंडी, केतकी देशपांडे, सुजाता पवार यांचा सहभाग असणार (Pune) आहे.