Team MyPuneCity – पोलीसांनी स्वागत कक्ष काढण्यासाठी नोटीस पाठवली , कायद्याचा आदर करीत आम्हीही सदर सभा मंडप कडून( Pune) घेतला आणि आज सकाळ पासून पादचारी मार्गांवर खाली बसून फराळ वाटप करण्यात आले. फक्त येरवडा पोलीस स्टेशन हद्दीमध्ये अश्या प्रकारे कारवाई पाहण्यात आली आहे, याची चौकशी व्हावी यासाठी पाठपुरावा करण्यात येणार असल्याचे शिवसेना एकनाथ शिंदे पक्षाचे शहर संघटक आनंद गोयल यांनी सांगितले. पालखी सोहळ्यात वारकऱ्यांना स्व. बिंदू माधव बाळासाहेब ठाकरे चौक येथे फराळ वाटपाच्या कार्यक्रमाच्या वेळी गोयल बोलत होते.
यावेळी उपाध्यक्ष सुनील जाधव, सुहास कांबळे, रवी आग्रवाल, धनंजय बराथे, प्रशांत मोरे, प्रमोद मोरे, दीपक आहिरे, सनी पवार, किसन दर्बी, असिफ शेख उपस्थित होते.
Maval Crime News : तिकोना पेठ येथे अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
मागील २५ वर्षांपासून वारकऱ्यांची संपूर्ण परिवार सेवा करीत आहे. यंदाच्या वर्षी अचानक मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिलेल्या आदेशाचा सन्मान करीत पालखी मार्गांवरील स्वागत कक्ष काढला. पण पोलीस प्रशासना कडून फक्त एकाच उचभ्रू व्यवसायिकाला परवानगी देण्यात आल्याने आमच्या धार्मिक भावना दुखावल्या गेल्या आहेत. ज्यांनी परवानगी दिली त्यांची चौकशी व्हावी या मागणीचे शिवसेना पक्षाचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देण्यात येणार असल्याचे गोयल यांनी ( Pune) सांगितले.