Team My Pune City –केंद्रीय गुन्हे अन्वेषण विभागाकडून (सीबीआय) कारवाई (Pune)होणार असल्याची भीती दाखवत सायबर चोरट्यांनी एका ८० वर्षीय ज्येष्ठ महिलेची तब्बल एक कोटी १९ लाख रुपयांची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी शिवाजीनगर येथील सायबर पोलिस ठाण्यात चोरट्यांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांनी तपास सुरू केला आहे.
तक्रारदार महिला या पुण्यातील रहिवासी असून, त्यांनी दिलेल्या फिर्यादीत सांगितले की, १६ ऑगस्ट रोजी त्यांच्या मोबाइलवर अनोळखी व्यक्तीचा कॉल आला. चोरट्यांनी स्वतःला पोलिस अधिकारी म्हणून परिचय करून दिला. व्हिडिओ कॉलवर त्यांनी पोलिसांसारखा गणवेश परिधान केला होता, ज्यामुळे महिलेचा विश्वास बसला. त्या चोरट्यांनी सांगितले की, “तुमच्या बँक खात्यात काळ्या पैशाच्या व्यवहारात वापर झाला आहे. याची चौकशी सीबीआय करत आहे. त्यामुळे तुमच्यावर आणि तुमच्या पतीवर अटक होऊ शकते.”
Anup More : भाजयुमो प्रदेशाध्यक्ष अनुप मोरे यांच्यासह सात जणांविरुद्ध भाजप महिला पदाधिकाऱ्याला जीवे मारण्याच्या धमकी प्रकरणी गुन्हा
Murder : जमिनीच्या वादातून तरुणाचा गळा चिरुन खून;आरोपींना नानोली भागातून घेतले ताब्यात
अशा प्रकारे भीती दाखवून चोरट्यांनी “कारवाई टाळण्यासाठी पैसे जमा करावे लागतील” असा विश्वास महिलेला दिला. या खोट्या आश्वासनावर विश्वास ठेवून महिलेने वेळोवेळी चोरट्यांच्या दिलेल्या खात्यात एकूण १ कोटी १९ लाख रुपये जमा केले. मात्र, पैसे मिळाल्यानंतर चोरट्यांनी तात्काळ आपले मोबाइल क्रमांक बंद केले.
काही दिवसांनंतर महिलेने चौकशी केली असता फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला. त्यांनी तातडीने सायबर पोलिसांकडे तक्रार दाखल केली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक स्वप्नाली शिंदे करत आहेत.


















