Team My Pune City – शहरात वाढत्या मेट्रो प्रवाशांमध्ये (Pune)सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा समोर आला आहे. महात्मा फुले मंडई मेट्रो स्थानक परिसरात मेट्रो प्रवासादरम्यान एका महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी पोलिसांनी बिहारमधील मूळचे असलेल्या एका ज्येष्ठ प्रवाशाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. या प्रकरणी तक्रारदार महिलेने विश्रामबाग पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून पोलिसांनी आरोपीविरुद्ध गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवारी (दि. 9 सप्टेंबर) दुपारी दोनच्या सुमारास तक्रारदार महिला मेट्रोने प्रवास करत असताना 65 वर्षीय आरोपी प्रवाशाने तिच्याकडे एकटक पाहत अश्लील इशारे केले. त्याने मोबाईल कॅमेऱ्याद्वारे तिची छायाचित्रे टिपण्याचा प्रयत्न केला. ही बाब महिलेच्या लक्षात येताच तिने तत्काळ मेट्रो स्थानकातील सुरक्षारक्षकांकडे तक्रार केली. सुरक्षारक्षकांनी संशयित प्रवाशाला ताब्यात घेऊन मंडई पोलिस चौकीत आणले.
Pune: BACARDIएक्सपिरियन्सेस प्रस्तुत CASA BACARDIऑन टूर, पुणे – सोबत आदित्य रिखारी
Talegaon-Chakan highway: तळेगाव-चाकण रस्त्यावर चार वाहनांचा विचित्र अपघात : एका महिलेचा मृत्यू, पाचजण जखमी
या प्रकरणी पोलिसांनी आरोपीविरुद्ध अश्लील वर्तन केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला असून त्याला नोटीस बजाविण्यात आली आहे. पुढील तपास सहायक पोलीस निरीक्षक वाघमारे करत आहेत.
दरम्यान, गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोमधील प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली होती. मंडई, कसबा पेठ, जिल्हा न्यायालय, स्वारगेट आदी स्थानकांवर विशेष गर्दी पाहायला मिळाली. वाढत्या प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी मेट्रो प्रशासन आणि पोलिसांनी बंदोबस्त ठेवून विविध उपाययोजना केल्या असल्या, तरी अशा प्रकारच्या घटना महिला प्रवाशांच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत.