Team My Pune city – महाविद्यालयीन युवतीचा पाठलाग करुन तिला त्रास, तसेच विनयभंग करणाऱ्या सडक सख्याहरीला येरवडा पोलिसांनी अटक केली. साहिल याकुब सय्यद (वय २४, रा. येरवडा) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याबाबत युवतीच्या बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार युवती एका महाविद्यालयात शिक्षण घेत आहे. आरोपी सय्यद हा जानेवारी महिन्यापासून युवतीचा पाठलाग करत होता. तो महाविद्यालयाच्या आवारात गेला. युवतीला धमकावून त्याने तिला मोटारीवर बसण्यास सांगितले. त्याने युवतीबरोबर छायाचित्र काढले, तसेच तिच्याशी अश्लील वर्तन करण्याचा प्रयत्न केला. सय्यद याच्या त्रासामुळे घाबरलेल्या युवतीने या घटनेची माहिती मोठ्या बहिणीला दिली. त्यानंतर बहिणीने येरवडा पोलीस ठाण्यात तक्रार दिली.
यावरून पोलिसांनी सय्यद याला अटक केली आहे. याचा पुढील तपास सहायक पोलीस करत आहेत.
Pune : अधिकाऱ्यासाठी पाच हजारांची लाच घेताना खासगी रायटर महिलेला रंगेहात अटक