Team My Pune City – शहरातील प्रमुख रस्त्यांचे डांबरीकरण ( Pune Road ) आंतरराष्ट्रीय पुणे ग्रँड चॅलेंज टूर सायकल स्पर्धेच्या पार्श्वभूमीवर करण्यात येणार असल्याची माहिती मिळताच पुणेकरांमध्ये समाधान व्यक्त झाले आहे. मात्र, नागरिकांच्या दैनंदिन प्रवासाशी निगडित असलेल्या गल्लीबोळांकडे दुर्लक्ष होत असल्याची नाराजी व्यक्त होत आहे.
सामान्य नागरिक, दुचाकीस्वार ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग, विद्यार्थी तसेच कष्टकरी वर्ग यांचा प्रवास प्रामुख्याने या गल्लीबोळांतूनच होतो. खड्डेमय ( Pune Road )आणि असमतोल रस्त्यांमुळे त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. अनेक ठिकाणी रस्त्यांची झालेली चाळण, समपातळीवर नसलेली ड्रेनेजची झाकणे आणि पावसाळ्यानंतर उघडकीस आलेली दुरवस्था ही नागरिकांच्या आरोग्य समस्यांनाही कारणीभूत ठरत असल्याचे निदर्शनास आले आहे.
PMPML : पुण्यातील सार्वजनिक वाहतुकीला नवी गती; पीएमपीएमएलच्या ताफ्यात दाखल होणार १,००० ई-बस
आता पावसाळा ओसरल्याने रस्त्यांच्या दुरुस्तीला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे मुख्य रस्त्यांप्रमाणेच गल्लीबोळांचेही तातडीने ( Pune Road ) डांबरीकरण सुरू करावे, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.
या संदर्भात मनपाने क्षेत्रीय कार्यालयांकडून खड्डेमय रस्त्यांची यादी तयार करून त्यांचे डांबरीकरण कधी होणार याची स्पष्ट माहिती पुणेकरांना द्यावी, अशी आग्रही मागणी सामाजिक कार्यकर्ते संदीप खर्डेकर यांनी केली ( Pune Road ) आहे.