Team My Pune City – गेल्या काही दिवसांपासून राज्यातील (Pune)विविध भागात पावसाचा जोर वाढला आहे. पुढील काही दिवस पावसाची संततधार कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे. गुरुवारी (23 जुलै) आणि शुक्रवारी (24 जुलै) राज्यातील काही जिल्ह्यात अतिवृष्टी होण्याची शक्यता वर्तवण्यात आली असून, हवामान विभागाकडून रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे.
रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पुणे जिल्ह्यातील घाटमाथा, सातारा जिल्ह्यातील घाटमाथा, कोल्हापूर जिल्ह्यातील घाट परिसर या भागांत अतिमुसळधार ते अतिवृष्टी होण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे. हवामान विभागाने या जिल्ह्यांसाठी रेड अलर्ट जारी केला आहे.
Hinjawadi IT Park : हिंजवडी आयटी पार्क ‘कोंडीमुक्त’ करण्यासाठी अतिरिक्त ‘वॉर्डन’
Bicycle rally : सरसेनापती उमाबाई दाभाडे सेवा प्रतिष्ठानच्या सायकल रॅलीस उत्स्फुर्त प्रतिसाद
कोकणातील तीन जिल्ह्यांमध्ये 25 जुलै रोजीही पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. रायगड, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्यात अतिमुसळधार ते अतिवृष्टीसदृश्य पावसाचा अंदाज आहे. त्याचबरोबर पूर्व विदर्भातील पाच जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज आहे. 26 जुलै रोजीही हवामान असेच राहण्याचा अंदाज आहे.