Team MyPuneCity – महाराष्ट्र ब्राह्मण सभा, जी सध्या आपला शतक महोत्सव साजरी करत आहे, त्यांच्या वतीने दरवर्षी दिला जाणारा स्वातंत्र्यवीर सावरकर पुरस्कार २०२५ यंदा थोरले बाजीराव प्रतिष्ठानचे सचिव कुंदन कुमार साठे यांना प्रदान केला जाणार आहे. २४ मे रोजी पुण्यातील कसबा पेठेतील आश्रम कार्यालयात होणाऱ्या विशेष समारंभात हा सन्मान देण्यात येणार आहे.
कुंदन साठे हे थोरले बाजीराव पेशवा यांच्या पराक्रमाचा प्रचार-प्रसार करण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून निष्ठेने कार्यरत आहेत. त्यांनी देशभर विविध ठिकाणी बाजीराव पेशव्यांचे पुतळे उभारले असून, अलीकडेच पालखेड येथे उभारल्या जाणाऱ्या बाजीराव पेशवा स्मारकाच्या भूमिपूजनाचा यशस्वी आयोजनही त्यांनी केला. या सोहळ्यात विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि पेशवांचे वंशज पुष्कर सिंह पेशवा प्रमुख उपस्थित होते.
Sangvi: मन ताजेतवाने राहण्याची खरी प्रेरणा म्हणजे कविता
साठे यांच्या कार्यामुळे हिंदवी स्वराज्याच्या इतिहासातील थोर सेनानींच्या स्मृती जागवण्याचे मोलाचे कार्य घडले आहे. त्यांच्या राष्ट्रप्रेमाने प्रेरित प्रयत्नांची दखल घेत महाराष्ट्र ब्राह्मण सभेने त्यांना यंदाचा सावरकर पुरस्कार जाहीर केला आहे.
पुरस्कार समारंभाच्या निमित्ताने स्वातंत्र्यवीर सावरकरांना अभिवादन करण्यात येणार असून, यावेळी “सावरकर युवकांसाठी” या विषयावर मंदार परळीकर यांचे प्रेरणादायी व्याख्यान होणार आहे.
महाराष्ट्र ब्राह्मण सभेच्यावतीने नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे की, त्यांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहून कुंदन साठे यांच्या कार्याचा गौरव करावा आणि सावरकरांचे राष्ट्रनिष्ठ विचार अंगीकारावेत.