Team My pune city – गृहबाजारात विक्रीच्या ( Pune Real estate) बाबतीत पुणे पुन्हा एकदा भारतातील सर्वाधिक किफायतशीर आणि विक्रीत आघाडीचे महानगर ठरले आहे. क्रेडाई पुणे आणि सीआरई मॅट्रिक्स यांनी संयुक्तपणे जुलै २०२५ मध्ये प्रसिद्ध केलेल्या “पुणे हाउसिंग रिपोर्ट २०२५” मध्ये ही बाब स्पष्ट झाली आहे. हा अहवाल एका विशेष कार्यक्रमात सादर करण्यात आला, ज्यामध्ये १०० हून अधिक सदस्य बिल्डर्स उपस्थित होते. हा अहवाल अधिकृतपणे सीआरई मॅट्रिक्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिषेक गुप्ता, क्रेडाई पुणे चे उपाध्यक्ष श्री अरविंद जैन, जनसंपर्क संयोजक श्री. कपिल गांधी, कार्यकारिणी सदस्य श्री. हिरेन परमार, आणि डेटा विश्लेषक श्री. राहुल अजमेरा यांच्या हस्ते सादर करण्यात आले.
२०२५ च्या पहिल्या सहामाहीत पुणे मेट्रोपोलिटन क्षेत्राने देशात सर्वाधिक घरविक्री केली. सुमारे ४४,००० युनिट्स विक्रीतून एकूण ₹३२,८०० कोटींची उलाढाल झाली ( Pune Real estate) असून, गेल्या तीन वर्षांत घराच्या सरासरी किमतीत २७% वाढ नोंदवली गेली आहे. पुण्याचा गृहबाजार २०२१ मध्ये ₹३६,००० कोटींपासून २०२४ मध्ये ₹६५,००० कोटींवर गेला — म्हणजेच तीन वर्षांत तब्बल ८०% वाढ. २०२५ च्या पहिल्या सहामाहीतच पुणेने आधीच ₹३३,००० कोटींपेक्षा जास्त घरविक्री मूल्य गाठले आहे.
गेल्या पाच वर्षांपासून पुणेने भारतातील प्रमुख महानगरांमध्ये सर्वाधिक घरविक्रीचा आकडा नोंदवत आपली आघाडी कायम राखली आहे — याचे श्रेय त्याच्या किफायतशीर( Pune Real estate) दरां, उत्कृष्ट वास्तव्ययोग्यता, आणि सुसज्ज पायाभूत सुविधांना जाते. राजधानी नसताना आणि बंदर सुविधांचा अभाव असूनही, पुणेने निवासी रिअल इस्टेट क्षेत्रात मोठ्या महानगरांना मागे टाकत आपले वर्चस्व कायम ठेवले आहे.
क्रेडाई पुणे–सीआरई मॅट्रिक्स चा अहवाल हा उद्योगातील सर्वाधिक विश्वासार्ह विश्लेषण म्हणून ओळखला जातो. हा अहवाल महाराष्ट्र नोंदणी व मुद्रांक विभाग (IGR) आणि ( Pune Real estate) महाराष्ट्र रिअल इस्टेट रेग्युलेटरी अथॉरिटी (MahaRERA) यांसारख्या अधिकृत शासकीय स्रोतांकडून मिळालेल्या पडताळलेलेल्या माहितीवर आधारित असतो.
₹७० लाखांखालील घरांच्या विक्रीतील हिस्सा २०२१ मध्ये ८५% होता, जो २०२५ च्या पहिल्या सहामाहीत ६०% पर्यंत घसरला आहे. याचप्रमाणे, ₹४५ लाखांखालील ( Pune Real estate) घरांचा हिस्सा देखील ५५% वरून ३५% पर्यंत कमी झाला आहे. या बदलामागे मुख्य कारणे म्हणजे वाढती बांधकाम खर्च, जमिनीच्या किमतीत झालेली मोठी वाढ आणि अधिक प्रशस्त व उच्च दर्जाच्या घरांची ग्राहकांमध्ये वाढती मागणी. दरम्यान, ₹७० लाख ते ₹२ कोटी किंमतीच्या घरांची मागणी गेल्या चार वर्षांत तिपटीने वाढली आहे.
यामध्ये ₹७० लाख–₹१ कोटी आणि ₹१–२ कोटी या विभागांमध्ये मोठ्या प्रमाणात नव्या प्रोजेक्ट्स लाँच झाले आहेत. ₹१ कोटीहून अधिक किंमतीच्या प्रीमियम ( Pune Real estate) व लक्झरी घरांच्या विक्रीत गेल्या तीन वर्षांत दुपटीने वाढ झाली आहे, जी अधिक मोठ्या आणि महागड्या घरांकडे कल दर्शवते. या बदलाला चालना देणारे प्रमुख भाग म्हणजे — पीसीएमसी, पुणे उत्तर-पश्चिम (हिंजवडी IT पार्क परिसर), आणि पुणे उत्तर-पूर्व (खराडी IT पार्क परिसर) — जे एकूण घरविक्रीपैकी ७५% हून अधिक वाटा मिळवतात.
या अहवालातील महत्वाचे ठळक मुद्दे:
· अद्वितीय किफायतशीरपणा:
पुणे मध्ये सरासरी घराची किंमत सुमारे ₹७५ लाख आहे तर पुण्याच्या तुलनेत इतर महानगरांमध्ये म्हणजे हैदराबाद – ₹१.८४ कोटी, बेंगळुरू – ₹१.६१ कोटी( Pune Real estate) आणि मुंबई – ₹२.२६ कोटी अशी सरासरी घरांच्या किमती खूपच जास्त आहे. तसेच पुणे भारतातील सर्वात किफायतशीर महानगर म्हणून ओळखले जाते. यामुळे उद्योग आणि स्थलांतरित लोकांसाठी हे शहर आकर्षणाचे केंद्र बनले आहे.
· ऑफिस मार्केटमध्ये भरभराट:
पुणे देशात कार्यालयीन जागांच्या विक्रीत ५व्या क्रमांकावर आहे. आता पुण्याचा कार्यालयीन क्षेत्र “१०० मिलियन चौरस फूट क्लब”मध्ये समाविष्ट झाला ( Pune Real estate) असून, २०३० पर्यंत हे क्षेत्र १५० मिलियन चौरस टपर्यंत पोहोचेल असा अंदाज आहे. (IIMB – सीआरई मॅट्रिक्स CPRI अहवालानुसार) गेल्या ३-४ वर्षांत ऑफिस रेंटल्समध्ये जवळपास ८.८% वाढ झाली आहे, याचा अर्थ अधिक नोकऱ्या निर्माण होतील, ज्यामुळे खरेदी क्षमता वाढेल आणि घरांची मागणीही वाढेल — हा सगळा विकास परस्परसंबंधित आहे.
Pune Crime News : छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची विटंबना करणाऱ्याला अटक
· वेअरहाउसिंगमध्ये आघाडी:
पुणे देशात वेअरहाउसिंग क्षेत्रात दुसऱ्या क्रमांकावर असून सध्या ५० मिलियन चौरस फूटचा साठा आहे आणि रिक्तता जवळजवळ शून्यावर आहे.
· पायाभूत सुविधांमध्ये वाढ:
लवकरच येणारे नवीन विमानतळ आणि विविध मनोरंजन स्थळे पुण्याच्या रिअल इस्टेट आणि आर्थिक विकासात भर घालणार आहेत.
· रिअल इस्टेटसाठी देशातील सर्वात किफायतशीर महानगर:( Pune Real estate)
पुणे आजही भारतातील सर्व महानगरांमध्ये सर्वाधिक मूल्य देणारे शहर ठरते, जिथे घरखरेदीदारांना इतर शहरांच्या तुलनेत अधिक फायदा मिळतो.
या कार्यक्रम दरम्यान क्रेडाई पुणेचे अध्यक्ष श्री. मनीष जैन यांनी सांगितले, “पुणेच्या रिअल इस्टेटचा इतिहास हा सातत्यपूर्ण विकासाचा आहे. पुणे मेट्रोपॉलिटन( Pune Real estate) क्षेत्राने घरविक्रीसाठी भारतातील आघाडीचे स्थान कायम राखले आहे. गृहखरेदीदारांसाठी प्रथम पसंतीचा पर्याय म्हणून पुण्याने स्वतःची ठाम ओळख निर्माण केली आहे. कार्यालयीन जागेच्या मागणीत पुणे देशात पाचव्या स्थानी आहे आणि वेअरहाउसिंगमध्ये दुसऱ्या स्थानी आहे.
या दोन्ही क्षेत्रांमध्ये भविष्यातील वाढीसाठी प्रचंड संधी आहे. पुण्याची मुळशी, महाबळेश्वर, लोणावळा यांसारख्या निसर्गरम्य व पर्यटनस्थळांशी ( Pune Real estate) असलेली जवळीक देखील या वाढीस चालना देत आहे. केवळ काही तासांच्या अंतरावर ही ठिकाणे असल्यामुळे शहरातील सुविधा आणि आठवड्याच्या शेवटी सुट्टीचा आनंद — या दोघांचा सुंदर समतोल येथे मिळतो.
Poultryshed : पोल्ट्रीशेड नोंदणी अभियान मावळात वेगाने सुरू
पुणेचा रिअल इस्टेट बाजार आता केवळ किफायतशीरतेपुरता मर्यादित न राहता प्रीमियम गृहनिर्माणाच्या दिशेने परिपक्व होत चालला आहे. या बदलाच्या केंद्रस्थानी राहून जबाबदारीने वाढीस प्रोत्साहन देणे आणि उद्योगात पारदर्शकता निर्माण करणे हे आमच्यासाठी अभिमानास्पद आहे.
सीआरई मॅट्रिक्स चे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री अभिषेक गुप्ता यांनी ( Pune Real estate) नमूद केले, क्रेडाई पुणेसोबत भागीदारी करून आणखी एक सखोल आणि दिशा ठरवणारा अहवाल सादर करताना अत्यंत आनंद होत आहे पुणे हे देशातील सर्वोत्तम कामगिरी करणारे महानगर म्हणून उदयास आले आहे आणि २०२५ च्या फक्त पहिल्या सहामाहीतच येथील घरविक्री ₹३२,००० कोटींच्या घरात पोहोचली आहे.
ही मागणीतील मोठी झपाट्याने वाढ दर्शवते. विशेषतः ₹१ कोटी ते ₹२ कोटी किंमतीतील युनिट्स पुणेकरांसाठी ‘नवीन हॉटस्पॉट’ ठरत असून अधिक ( Pune Real estate) मोठी व प्रशस्त घरे घेण्याकडे कल वाढत आहे. तसेच २०२५ मध्ये घरखरेदीत सर्वाधिक आघाडीवर असलेले क्षेत्र म्हणजे पुणे उत्तर-पश्चिम आणि पीसीएमसी. पुण्याच्या गृहबाजाराची वाढ ही आता फक्त सुरुवात आहे मला विश्वास आहे की लवकरच पुणे वर्षाला १ लाख युनिट्सच्या विक्रीचा आकडा गाठेल.
ग्राहकांकडे आता अफॉर्डेबलपासून प्रीमियम पर्यंत १, २, ३ आणि ४ बीएचकेच्या घरांचा भरपूर पर्याय उपलब्ध आहे. याशिवाय, लवकरच सुरू होणाऱ्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणे आता केवळ १.५ ते २ तासांच्या अंतरावर असेल, ज्यामुळे शहराची कनेक्टिव्हिटी आणि आकर्षण दोन्ही वाढतील”
रिअल इस्टेट डेव्हलपर आणि डेटा अॅनालिस्ट श्री. राहुल अजमेरा म्हणाले, “जानेवारी ते जून २०२५ या कालावधीत पुण्यात नवीन घरांच्या प्रकल्पांच्या लाँचिंगमध्ये लक्षणीय घट झाली, ज्यामुळे घरखरेदीदारांसाठी उपलब्ध इन्व्हेंटरी कमी झाली.
या पुरवठ्यातील घटेमुळे विकसकांना त्यांच्या अनविक्रीत स्टॉकचा निपटारा करण्याची संधी मिळाली. नवीन प्रकल्पांच्या पर्यायांमध्ये मर्यादा येण्यामागील मुख्य कारण म्हणजे ( Pune Real estate) पर्यावरण परवानग्यांच्या (एन्व्हायर्मेंटल क्लीअरन्सस – ECs) मंजुरीत झालेला विलंब होता. तथापि, अलीकडील घडामोडींमधून असे दिसून येत आहे की हे नियमसंबंधी अडथळे दूर केले जात आहेत, ज्यामुळे प्रलंबित प्रकल्पांना वेळेत मंजुरी मिळण्यास मदत होईल आणि बाजार स्थिर होईल अशी अपेक्षा आहे.”
पुण्यातील रिअल इस्टेट बाजारात सध्या ग्राहकांच्या वागणुकीत लक्षणीय बदल पाहायला मिळत आहे. आजचा ग्राहक अधिक माहितीपूर्ण, महत्त्वाकांक्षी असून भविष्यासाठी ( Pune Real estate) योग्य अशा घरांमध्ये गुंतवणूक करण्यास सज्ज आहे. पूर्वी किमतीबाबत संवेदनशील मानल्या गेलेल्या भागांमध्येही आता 2.5 आणि 3 बीएचके घरांची मागणी वाढताना दिसत आहे, यावरून मध्यम-प्रीमियम इन्व्हेंटरीची गरज अधोरेखित होते.
पुणे मेट्रो, रिंग रोड आणि नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळ यांसारख्या नव्या पायाभूत प्रकल्पांमुळे पुणे हे शाश्वत शहरी विकासाचे राष्ट्रीय मॉडेल बनण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. अहवालात नमूद केल्याप्रमाणे, वेळेवर प्रकल्पांना मंजुरी, धोरणात्मक पाठबळ आणि जमीन अभिलेखांचे डिजिटलायझेशन यामुळे ही प्रगती आणखी गती घेऊ ( Pune Real estate) शकते.