situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: रसिकांनी अनुभवले ‘परमेलप्रवेशक’ रागांचे सौंदर्य; गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे आयोजन ‌

Published On:

Team MyPuneCity – दिवसाच्या आठ प्रहरांमध्ये बांधलेले उत्तर भारतीय संगीतातील रागचक्राचे सुरेल आवर्तन रसिकांनी ‘परमेलप्रवेशक राग – रंग’ या मैफलीच्या माध्यमातून अनुभवले. संगीतातील विविध थाट, त्यातील दोन थाटांच्या सीमारेषांवर उभे असलेले राग आणि त्यांच्यातील शुद्ध – कोमल स्वरांच्या संगती यांचे सुंदर दर्शन या मैफलीतून घडले.

भारतीय संगीत प्रसारक मंडळाच्या गांधर्व महाविद्यालय, पुणेतर्फे ‌‘परमेलप्रवेशक राग-रंग‌’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन महाविद्यालयातील विष्णू विनायक स्वरमंदिरात करण्यात आले होते.

Talegaon Dabhade : तळेगाव दाभाडे नगर परिषदेत मॉक ड्रिल

कार्यक्रमाची संकल्पना आणि संहिता लेखन संगीताचार्य डॉ. ज्योती काळे यांची होती. या कार्यक्रमात गायिका डॉ. मीनल देशपांडे व शुचिता आठलेकर, तसेच स्वतः संगीताचार्य डॉ. ज्योती काळे यांनी विविध बंदिशी सादर केल्या. तोडी, भैरव, मारवा, कल्याण, भैरवी, खमाज, पूर्वी, बिलावल, काफी आणि आसावरी या दहा थाटांमधील सीमारेषेवर वावरणारे राग, समयचक्रानुसार होणारे त्यांचे सादरीकरण, शुद्ध – कोमल स्वरांचे नक्षीकाम तसेच तीव्र स्वरांची स्थाने, याविषयीचे विवेचन डॉ. ज्योती काळे यांनी केले. त्यापाठोपाठ आठ प्रहरांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या आठ रागांतील आठ बंदिशी सादर झाल्या. मुलतानी रागामधील सरगमगीतापासून सुरू झालेला हा सांगीतिक प्रवास जौनपुरी रागातील तराण्यापर्यंत रसिकांना खिळवून ठेवणारा होता. बीत गयो जनम (पूरिया – ताल त्रिताल), तू जयमाल रानी (जयजयवंती – एकताल), कहा तुम पिया (अडाणा – झपताल), शामसुंदर मनमोहन (भैरवी – दादरा), जागो जागो रे नंद दुलार (भटियार – त्रिताल), कवन बटरिया (अल्हैया बिलावल – अध्धा त्रिताल) आणि तराणा (जौनपुरी – रूपक) अशा बंदिशी सादर झाल्या.

Alandi : श्री संत ज्ञानेश्वर महाराज जन्मोत्सव सोहळ्यातील भावर्थांचे बहुरूपी भारुड भाविकांना भावले

दोन थाटांच्या मधले सीमारेषेजवळचे राग म्हणजे परमेलप्रवेशक राग, असे सांगून डॉ. ज्योती काळे यांनी या संकल्पनेचे शास्त्रीय आणि सौंदर्यशास्त्रीय, अशी दोन्ही रूपे स्पष्ट केली.

त्यांना स्वानंद कुलकर्णी (संवादिनी), श्रीकांत भावे (तबला) यांनी अनुरूप साथसंगत केली. भारती विद्यापीठाच्या कॉलेज ऑफ परफॉर्मिंग आर्ट्‌सचे संचालक डॉ. शारंगधर साठे यांच्या हस्ते कलाकारांचा सत्कार करण्यात आला. गांधर्व महाविद्यालयाचे प्राचार्य पंडित प्रमोद मराठे यांनी प्रास्ताविक केले. ज्येष्ठ गायिका, गुरू, रचनाकार विदुषी डॉ. माधुरी डोंगरे, गायिका अनुराधा मराठे, अंजली मालकर आदी उपस्थित होते.

Follow Us On