Team My Pune City – पुणे जिल्ह्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे धरण क्षेत्रात पाण्याची आवक मोठ्या ( Pune Rain Update) प्रमाणात वाढली असून, यामुळे खडकवासला धरणातून विसर्गात वाढ करण्याचा निर्णय पाटबंधारे विभागाने घेतला आहे. आज (सोमवारी) सकाळी 8 वाजता 18 हजार 483 क्युसेक्सवरून विसर्ग वाढवून 22 हजार 121 क्युसेक्सने पाणी सोडले जाणार आहे, अशी माहिती मध्यवर्ती पूर नियंत्रण कक्ष, पुणे यांनी दिली.
तसेच, पुणे शहरालगतच्या( Pune Rain Update) तीनही महत्त्वाच्या धरणांमधून सध्या मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. वरसगाव धरणातून 8 हजार 474 क्युसेक्स, पानशेतमधून 3 हजार 8 क्युसेक्स, तर खडकवासला धरणातून 22 हजार 121 क्युसेक्स विसर्ग सुरू असल्याचे अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.
पवना धरणातून 1900 क्युसेक्स विसर्ग
मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे( Pune Rain Update) मावळ परिसरातील प्रमुख पवना धरण भरून वाहू लागले आहे. आज सकाळी 6 वाजेच्या अहवालानुसार, धरणात एकूण 86.60 टक्के जलसाठा असून, त्यामुळे धरणातून 1900 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात आला आहे. पाटबंधारे विभागाने यासंदर्भात नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.
Accident : पुण्यात दोन वेगवेगळ्या घटनेत गच्चीवरून पडून 2 वर्षीय मुलगी व 13 वर्षीय मुलगा गंभीर जखमी
धरणाच्या स्थितीबाबत मिळालेल्या माहितीनुसार, पवना धरणाची ( Pune Rain Update)पाणीपातळी 611.76 मीटर (2007.10 फूट) इतकी झाली आहे. सध्या धरणात एकूण 239.87 दशलक्ष घनमीटर ( 8472.90 दशलक्ष घनफूट) पाणी साठवले आहे, तर उपयोगी साठा 208.73 दशलक्ष घनमीटर (7372.90 दशलक्ष घनफूट) इतका आहे.
आज सकाळपर्यंत 2 मिमी पावसाची नोंद झाली असून, काल 33 मिमी पाऊस झाला होता. यंदाच्या हंगामात एकूण 1703 मिमी पावसाची नोंद झाली ( Pune Rain Update) आहे.
सध्या धरणातून विसर्गाचे प्रमाण खालीलप्रमाणे आहे:
जलविद्युत केंद्राद्वारे : 800 क्युसेक्स
स्पिलवे (सांडव्यामार्फत) : 1100 क्युसेक्स
एकूण विसर्ग : 1900 क्युसेक्स
पूर नियंत्रण कक्षाच्या अहवालानुसार, धरण क्षेत्रामध्ये पावसाचा जोर कायम असल्याने आगामी काही तासांत विसर्गामध्ये टप्प्याटप्याने आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे पुणे महानगरपालिका हद्दीतील सर्व नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला ( Pune Rain Update) आहे. नदीकाठी राहत असलेल्या नागरिकांनी नदीपात्राजवळ जाणे टाळावे, तसेच जनावरे, वाहने किंवा तत्सम साहित्य असल्यास तात्काळ सुरक्षित स्थळी हलवावे, असे आवाहन करण्यात आले आहे.
यासोबतच, पूर नियंत्रण कक्षाच्या संनियंत्रण अधिकारी श्वेता कु-हाडे यांनी संबंधित यंत्रणांना तत्काळ कार्यवाही करून योग्य ती खबरदारी घेण्याच्या सूचना दिल्या आहेत. पुणे महानगरपालिका, पोलिस विभाग, अग्निशमन दल तसेच आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही माहिती देण्यात ( Pune Rain Update) आली आहे.
Rashi Bhavishya 28 July 2025 : कसा जाईल आपला आजचा दिवस?
सार्वजनिक सुरक्षेच्या दृष्टिकोनातून प्रशासनाने अत्यंत दक्ष राहण्याची गरज असून, नागरिकांनी अफवांवर विश्वास न ठेवता अधिकृत माहितीचीच दखल घ्यावी, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात ( Pune Rain Update) आले आहे.