Team My Pune City – राज्यासह पुणे जिल्ह्यातील पावसाचा जोर ( Pune Rain Update) कायम असून, हवामान विभागाने आज दिनांक 23 सप्टेंबर रोजी पुणे जिल्ह्यासाठी ऑरेंज अलर्ट जाहीर केला आहे. पुढील काही तासांत पुणे शहर व परिसरात विजांच्या कडकडाटासह वादळी पावसाची शक्यता असून, ३० ते ४० किमी प्रतितास वेगाने वारे वाहतील, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.
शहरात वाहतुकीवर परिणाम होण्याची शक्यता
पुणे शहरात दुपारनंतर पावसाचा जोर वाढेल. त्यामुळे शहरातील खालच्या भागांत पाणी साचणे, वाहतुकीत अडथळे निर्माण होणे, तसेच विद्युत पुरवठा खंडित होण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे. नागरिकांनी अनावश्यक बाहेर न पडता सावधगिरी बाळगावी, अशी विनंती ( Pune Rain Update) प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
Tungai Temple : तुंग गडावर आई तुंगाई देवळात घटस्थापना, साजरा होणार शारदीय नवरात्रोत्सव
मान्सून किमान ३० सप्टेंबरपर्यंत कायम
बंगालच्या उपसागरावर निर्माण होणाऱ्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे २६ ते २८ सप्टेंबरदरम्यान राज्यासह पुणे जिल्ह्यात पावसाचे प्रमाण वाढेल. त्यामुळे मान्सूनचा निरोप किमान ३० सप्टेंबरपर्यंत पुढे ढकलला जाणार आहे.
पुणे जिल्ह्यात पावसामुळे पूरस्थिती निर्माण झाल्यास नागरिकांनी त्वरित जिल्हा आपत्कालीन कार्य केंद्राशी संपर्क साधावा. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून परिस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये, असेही प्रशासनाने स्पष्ट केले ( Pune Rain Update) आहे.