Team My Pune City – पुणे शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या ( Pune Rain News)आणि मुठा नदीपात्रातील जलप्रवाह नियंत्रित करणाऱ्या खडकवासला धरणातून होणारा विसर्ग गुरुवारी (दि.21) सकाळी कमी करण्यात आला आहे. धरणाच्या सांडव्यावरून सुरू असणारा 39 हजार 138 क्युसेक पाणी विसर्ग कमी करून सकाळी 10 वाजता 32 हजार 290 क्युसेक करण्यात आला आहे, अशी माहिती उपविभागीय अभियंता मोहन भदाणे यांनी दिली.
सद्यस्थितीत पावसाचे प्रमाण काहीसे कमी झाल्याने विसर्गात घट ( Pune Rain News)करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. तथापि, परिसरातील पावसाच्या प्रमाणानुसार व येणाऱ्या पाण्याच्या ओघानुसार विसर्ग पुन्हा कमी-जास्त करण्याची शक्यता असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
मागील 24 तासातील पाऊस –
दरम्यान, पुणे विभागात गेल्या २४ तासांत मध्यम ते हलक्या( Pune Rain News)स्वरूपाचा पाऊस नोंदविण्यात आला आहे. सर्वाधिक पाऊस चिंचवड येथे २३ मिमी, तर तळेगावात १९ मिमी पडला आहे. निमगिरी (१६.५ मिमी), लवळे (१३ मिमी), राजगुरुनगर व नारायणगाव (१२ मिमी), माळीन (११.५ मिमी), दुधुळगाव (१०.५ मिमी) येथेही लक्षणीय पाऊस झाला. मात्र पुणे शहरात (शिवाजीनगर ४ मिमी, हडपसर १ मिमी, पाषाण ४.५ मिमी) तुलनेने कमी पाऊस नोंदवला गेला.
हवेली व पुरंदर तालुक्यात फक्त अर्धा मिमी इतका नाममात्र पाऊस ( Pune Rain News) झाल्यामुळे खडकवासला धरण परिसरातील येणाऱ्या पाण्यात घट झाली आहे. त्यामुळे नदीपात्रातील प्रवाह तुलनेने कमी होण्याची शक्यता आहे.