Team My Pune City – देशातील सर्वाधिक गर्दी ( Pune Railway Station) असणाऱ्या १७ रेल्वे स्थानकांमध्ये पुणे रेल्वे स्थानकाचा समावेश असून, दररोज सुमारे दीड लाख प्रवासी या स्थानकावरून प्रवास करतात. वाढत्या गर्दीमुळे प्रवाशांना होणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणि रेल्वे प्रवास अधिक सुलभ करण्यासाठी पुणे स्थानकावर प्रथमच ‘वॉर रूम’ची स्थापना करण्यात आली आहे.
मध्य रेल्वे पुणे विभागाचे अतिरिक्त विभागीय रेल्वे व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांनी दिलेल्या माहितीनुसार, रेल्वेच्या आधुनिकीकरणामुळे प्रवाशांची संख्या झपाट्याने वाढली आहे. मर्यादित क्षमतेमुळे गर्दी हाताळणे आव्हानात्मक ठरत असल्याने, भारतीय रेल्वेच्या मार्गदर्शनानुसार ही नवी व्यवस्था सुरू करण्यात आली आहे.
Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी शेतकऱ्यांना प्रति एकर एक कोटी मोबदला
जाधव यांनी सांगितले की, वॉर रूममुळे गर्दीचे नियमन करणे ( Pune Railway Station) सोपे झाले आहे. गाडी फलाटावर येण्यापूर्वीच प्रवाशांना सूचना दिल्या जातात. ज्या ठिकाणी गाड्यांमध्ये जास्त गर्दी असते, त्या ठिकाणी अतिरिक्त मनुष्यबळ आणि सुरक्षा जवान तैनात केले जातात. प्रवाशांचे साहित्य हरवणे, पिशवी सापडणे किंवा इतर तक्रारी थेट वॉर रूममध्ये नोंदवता येतात. अशा तक्रारींचा २० मिनिटांत निपटारा केला जातो.
प्रवाशांकडून येणाऱ्या तक्रारींमध्ये गाडीतील पंखे बंद असणे, अस्वच्छता, खराब बेडरोल, स्वच्छतागृहात पाणी नसणे, विद्युत उपकरणातील बिघाड, मोबाईल चार्जर समस्या, गाडी विलंब, सहप्रवाशांचे गैरवर्तन अशा बाबींचा समावेश आहे. या तक्रारी ‘रेल मदत’ अॅप किंवा रेल्वेच्या ‘एक्स’वरील अधिकृत हँडलवर सर्वाधिक प्रमाणात नोंदवल्या जात आहेत.
वॉर रूमची वैशिष्ट्ये ( Pune Railway Station)
- तक्रारींचा २० मिनिटांत निपटारा
 - २४ तास कार्यरत व्यवस्था
 - १० कर्मचाऱ्यांची नेमणूक
 - डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर
 - तक्रार मिळताच संबंधित गाडीतील किंवा स्थानकावरील कर्मचाऱ्याशी थेट संप
 


















