Team My Pune City – पुणे रेल्वे स्थानक परिसरात वाढत्या ( Pune Railway Station) मोबाईल चोरीच्या घटनांवर अंकुश ठेवण्यासाठी पुणे लोहमार्ग पोलीस आणि आरपीएफ पथकाने संयुक्त कारवाई करत दोन सराईत चोरट्यांना गजाआड केले आहे. या दोघांकडून एकूण 20 मोबाईल फोन जप्त करण्यात आले असून त्यांची किंमत सुमारे 1 लाख 90 हजार रुपये एवढी आहे.
फिर्यादी रूतुराज दिलीपराव काटकर (वय 26 रा. वडगाव शेरी) यांचे मित्र संजय मडीया डिन्डोड यांचा विवो कंपनीचा 15 हजार रुपये किंमतीचा मोबाईल फोन दि. 30 ऑगस्ट रोजी रात्री ( Pune Railway Station) साडेआठच्या सुमारास पुणे रेल्वे स्टेशन प्लॅटफॉर्म क्रमांक 1 वर उभ्या दानापूर एक्सप्रेसच्या डब्यात चढत असताना अज्ञात चोरट्याने लंपास केला होता. याप्रकरणी पुणे लोहमार्ग पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.
या गुन्ह्याच्या तपासादरम्यान पोलिसांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती ( Pune Railway Station) मिळाली की, मंगळवार पेठ सिग्नल चौक परिसरात काही संशयित इसम झोपड्या करून राहतात व त्यांनी मोबाईल चोरी करून ठेवले आहेत. त्यावरून पोलिसांनी आरपीएफ पथकासह छापा टाकला असता, संशयित बुध्दराज मोरपाल बागडी (वय ३२, रा. डिलोदा, राजस्थान) आणि अमरलाल हंसराज बागडी (वय २२, रा. बडा का बालाजी, राजस्थान) हे दोघे पळून जाण्याचा प्रयत्न करताना पकडले गेले.
यानंतर त्यांच्या झोपडीची झडती घेतली असता, चोरीस गेलेला ( Pune Railway Station) विवो मोबाईल तसेच विविध कंपन्यांचे.1 लाख 90 हजार 400 रुपयांचे एकूण 20 मोबाईल फोन पोलिसांनी हस्तगत केले. प्राथमिक चौकशीत हे दोघेही जुन्या बाजारातून मोबाईल खरेदी करून स्वस्त दरात विक्री करत असल्याचे उघड झाले. अखेर त्यांनी मोबाईल चोरीची कबुली दिल्याने त्यांना अटक करण्यात आली आहे.
ही कारवाई लोहमार्ग पुणे पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप, अपर पोलीस अधीक्षक रोहीदास पवार, उपविभागीय पोलीस अधिकारी जयराम पायगुडे यांच्या मार्गदर्शनाखाली, वरिष्ठ पोलीस निरीक्षक प्रमोद खोपीकर यांच्या पथकाने केली. यात पोलीस उपनिरीक्षक यशवंत साळुंके, सपोफौ सुनिल कदम, अनिल दांगट, पो.हवा. निलेश बिडकर, पोलीस शिपाई सिध्दार्थ वाघमारे, नेमाजी केंद्रे, मारटकर, छाया चव्हाण, शेख तसेच आरपीएफ पुणे युनिटचे निरीक्षक यादव, उपनिरीक्षक लाड, आरक्षक युवराज गायकवाड, विशाल माने आणि रसुल सय्यद यांनी ( Pune Railway Station) केली.