Team My Pune City –दिवाळीच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची ( Pune Railway) गर्दी वाढण्याची शक्यता लक्षात घेता, फुकट्या प्रवाशांवर कारवाईसाठी विशेष तपासणी मोहीम राबविण्यात येणार आहे. पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक राजेशकुमार वर्मा आणि अतिरिक्त विभागीय व्यवस्थापक पद्मसिंह जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम सुरू होणार असून, भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.
दिवाळीनिमित्त अतिरिक्त गाड्या सोडण्यात आल्यामुळे फलाट तिकीट सेवा तात्पुरती बंद करण्यात आली आहे. त्यामुळे विनातिकीट प्रवास करणाऱ्यांवर लक्ष ठेवण्यासाठी भरारी पथकांकडून कारवाई केली जाणार असल्याची माहिती जनसंपर्क अधिकारी हेमंतकुमार बेहरा यांनी दिली.
Bribe Case : कोथरूड पोलिस ठाण्यातील पोलिस शिपायाला 10 हजारांची लाच घेताना रंगेहात अटक
मध्य रेल्वेच्या पुणे विभागाने मागील सहा महिन्यांत तिकीट न घेता प्रवास करणाऱ्या तब्बल दोन लाख २७ हजार ८९५ प्रवाशांवर कारवाई करत १२ कोटी ७६ लाख रुपयांचा दंड वसूल केला आहे. यामध्ये सप्टेंबर महिन्यात सर्वाधिक २ कोटी ३५ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात ( Pune Railway) आला.
सप्टेंबर महिन्यातील कारवाईचा तपशील:
- तिकीट नसलेले प्रवासी: २९,७३९ जणांवर कारवाई; दंड – ₹१ कोटी ८६ लाख ७९ हजार
- आरक्षित डब्यातून अनधिकृत प्रवास: ८,४२५ जणांवर कारवाई; दंड – ₹४८ लाख ८ हजार
- अनधिकृत सामानासह प्रवास: ४७२ जणांवर कारवाई; दंड – ₹७४ हजार ७८५
- एकूण कारवाई: ३८,६३६ प्रवासी; एकूण दंड – ₹२ कोटी ३५ लाख ६३ हजार
रेल्वे प्रशासनाने स्पष्ट केले आहे की, गर्दीच्या काळात फुकट्या प्रवाशांवर कोणतीही गय केली जाणार नाही. तपासणी मोहीम अधिक ( Pune Railway) तीव्र करण्यात येणार असून, नियमभंग करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल.