Team MyPuneCity – जागतिक पर्यावरण दिनानिमित्त पुणे शहर पोलिस, वनविभाग आणि वृक्षथॉन फाउंडेशन यांच्या (Pune ) संयुक्त विद्यमाने ‘वृक्षथॉन मॅरेथॉन’चे भव्य आयोजन १ जून २०२५ रोजी करण्यात आले. पर्यावरण संवर्धन, झाडांची लागवड (Pune) आणि आरोग्यविषयी जनजागृती करण्याचा उद्देश या उपक्रमामागे होता.
या मॅरेथॉनची सुरुवात शिवाजीनगर येथील पोलिस मुख्यालयाच्या मैदानातून झाली. २१ कि.मी., १० कि.मी., ५ कि.मी. आणि ३ कि.मी. अशा चार अंतरांच्या मॅरेथॉन रेसमध्ये एकूण १०,००० हून अधिक धावपटूंनी नोंदणी केली होती. सकाळी ५ वाजता २१ किमी अंतराच्या शर्यतीला सुरुवात झाली, त्यानंतर इतर शर्यती टप्प्याटप्प्याने सुरू झाल्या.
Pune : राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी पुणे शहर कार्यकारी अध्यक्षपदी हाजी फिरोज शेख यांची निवड
मॅरेथॉनच्या उद्घाटनप्रसंगी पोलिस आयुक्त अमितेश कुमार, मुख्य वनसंरक्षक एन.आर. प्रवीण, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, चितळे ग्रुपचे इंद्रनील चितळे, जिल्हा वनसंरक्षक महादेव मोहिते हे प्रमुख पाहुणे उपस्थित होते. त्यांनी झेंडा दाखवून स्पर्धेला सुरूवात करून दिली.

धावपटूंनी पोलिस मैदान, विद्यापीठ चौक, पाषाण, बावधन मार्गावरून धावत जाताना पर्यावरण आणि आरोग्याविषयी जनजागृती केली. प्रत्येक सहभागी धावपटूला आयोजकांकडून मेडल, प्रमाणपत्र आणि देशी झाडांचे रोप भेट म्हणून देण्यात (Pune) आले.
ही मॅरेथॉन विशेष ठरली कारण राज्य शासनाच्या दोन प्रमुख विभागांनी – पोलिस आणि वन विभाग – वृक्षथॉन फाउंडेशनसोबत मिळून हा उपक्रम राबवला. चितळे बंधू, पंचशील, बजाज, क्रेडाई, Emcure, ॲक्सिस बँक, भारती विद्यापीठ, गृहम फायनान्स, आदर पूनावाला संस्था, संचेती हॉस्पिटल, मॉडर्न आणि फर्ग्युसन कॉलेज फिजिओथेरपी विभाग यांच्यासह अनेक संस्था, कर्मचारी आणि धावपटू ग्रुप्स यांनी यात उत्स्फूर्त सहभाग घेतला.
बक्षीस समारंभात पोलिस आयुक्त अमितेश कुमार, पोलिस सहआयुक्त रंजनकुमार शर्मा, अपर पोलिस आयुक्त (पूर्व विभाग) मनोज पाटील, मुख्य वनसंरक्षक आर.एन. प्रवीण, तुषार बव्हाण आणि इंद्रनील चितळे यांच्या हस्ते विजेत्यांना EV कार, EV दुचाकी, EV सायकल आणि रोख पारितोषिकांचे वितरण करण्यात आले.
या मॅरेथॉनच्या माध्यमातून आरोग्य आणि पर्यावरण संवर्धनाचा सकारात्मक संदेश पुणेकरांपर्यंत पोहोचवण्यात (Pune) आला.