Team My Pune City –पुणे शहराच्या वाढत्या लोकसंख्येसोबतच(Pune) नागरी भागातील स्वच्छता व पायाभूत सुविधा सक्षम करण्यासाठी पुणे महानगरपालिकेच्या मलनि:सारण प्रकल्पाला ८४२.८५ कोटी रुपयांची प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. या प्रकल्पामुळे शहरातील मलनि:सारण व्यवस्था अधिक आधुनिक आणि कार्यक्षम होणार असून पर्यावरण संवर्धनासही मोठी मदत मिळणार आहे.
हा प्रकल्प ‘अमृत 2.0’ अभियानांतर्गत हाती घेण्यात येत आहे. देशभरातील ४४ शहरांमध्ये मलनि:सारण सुधारणा प्रकल्प कार्यान्वित होणार असून त्यात पुण्याचाही समावेश आहे. या उपक्रमामुळे शहरातील मलनि:सारण क्षमतेत वाढ होऊन स्वच्छ पाणी व्यवस्थापन व आरोग्यदायी पर्यावरण घडवले जाईल.
Mohan Agashe: संवेदनक्षम मनाची क्षमता न ओळखणे ही आधुनिक अस्पृश्यता – डॉ. मोहन आगाशे
Naigaon Crime News : नायगाव येथे रिक्षाचालकाला मारहाण
या प्रकल्पासाठी निधीचे वाटप पुढीलप्रमाणे होणार आहे :
केंद्र सरकारकडून – ₹२५२.८६ कोटी
राज्य सरकारकडून – ₹२१०.७१ कोटी
पुणे महानगरपालिकेकडून – ₹२०.४९ कोटी
तर उर्वरित निधी खाजगी भागीदारीतून (PPP मॉडेलद्वारे) उभारण्यात येणार आहे.
या प्रकल्पामुळे शहरातील मलनि:सारण प्रक्रिया अधिक कार्यक्षम होणार आहे.