Team My Pune City – 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष, (Pune)ज्येष्ठ साहित्यिक विश्वास पाटील यांनी प्रकाशक संघाच्या कार्यालयात सदिच्छा भेट दिली.
या प्रसंगी अखिल भारतीय मराठी प्रकाशक संघातर्फे प्रकाशक संघाचे संस्थापक सदस्य व विद्यमान सल्लागार शरद गोगटे आणि प्रकाशक संघाचे अध्यक्ष राजीव बर्वे यांच्या हस्ते विश्वास पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात आला. याप्रसंगी पाटील यांनी संघाच्या कार्यकारिणी सदस्यांशी प्रकाशकांच्या आणि ग्रंथालयांच्या अडचणींवर चर्चा केली.
Talegaon Dabhade-कायद्याचे शिक्षण हे समाजाच्या न्यायव्यवस्थेचा पाया -प्रा. डॉ. सुरेश गोसावी
Shekhar Singh : पिंपरी-चिंचवड महापालिकेचे आयुक्त शेखर सिंह यांची बदली; कुंभमेळ्याचे आयुक्त म्हणून नवी जबाबदारी
ग्रंथालये सशक्त करण्याचा व वाचन संस्कृतीला चालना देण्याचा प्रयत्न असल्याचे पाटील म्हणाले. ग्रंथपालांना किमान वेतन मिळाले पाहिजे, गाव तेथे ग्रंथालय ही चळवळ परत सुरू होण्यासंदर्भात साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावरून मते मांडणार असल्याचे त्यांनी आवर्जून सांगितले.