Team my pune city news – घराच्या खरेदीखताची प्रत मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाकडून पाच हारांची लाच घेणाऱ्या खासगी रायटर महिलेला अटक करण्यात आली आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक पथकाच्या वतीने आज (मंगळवारी) खडक पोलीस ठाणे परिसरात करण्यात आली.
अनिता विनोद रणपिसे (वय ५२) असे अटक महिलेचे नाव आहे. याप्रकरणील ४५ वर्षीय पुरुषाने तक्रार दिली आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधीत महिला ही सासवड येथील दुय्यम निबंधक कार्यालयाच्या बाहेर खासगी रायटर म्हणून काम करते. फिर्यादी यांना त्यांच्या बँकेच्या कामासाठी घराच्या खरेदीखताची प्रत हवी असल्याने त्यांनी निबंधक कार्यालयाला भेट दिली असता त्यांना आरोपी यांनी संबंधीत अधिकाऱ्यासाठी पाच व स्वतःसाठी एक हजार अशी सहा हजार रुपयांची मागणी केली. हा सारा प्रकार २७ ते ३० जून दरम्यान घडला.
मागणीुसार फिर्यादी हे रक्कम घेवून गेले असता आारोपीने एक हजार परत करत पाच हजार रुपयांची रक्कम स्वीकारली. यावेळी सापळा रचून तयार असलेल्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने आरोपीला रंगेहात अटक केली. यावरून खडक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून पोलीस पुढील तपास करत आहेत.