Team My Pune City –सुप्रसिद्ध गायिका आशा भोसले यांच्या वाढदिवसानिमित्त पूना गेस्ट हाऊस स्नेह मंचतर्फे त्यांच्या लोकप्रिय हिंदी-मराठी गीतांचा ‘अतुलनिय आशा’ हा (Pune)सांगितीक कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे.
कार्यक्रम सोमवार, दि. 8 सप्टेंबर 2025 रोजी सायंकाळी 5 वाजता(Pune) पूना गेस्ट हाऊस, लक्ष्मी रस्ता येथे आयोजित करण्यात आला आहे.
Devendra Fadnavis: सिंहगड रस्त्यावर पुण्यातील सर्वात मोठा उड्डाणपूल मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण करून वाहतुकीसाठी झाला खुला
डॉ. वर्षा जांभेकर यांची प्रस्तुती असलेल्या कार्यक्रमात आशा भोसले यांनी गायलेली गीते माया माईनकर, हेमा कुलकर्णी, अनघा एकबोटे, मेधा सेनगावकर, शुभांगी पांचाळ, धनंजय इंगळे, योगेश वाघेला, उदय गाडगीळ, अतुल महाजन सादर करणार आहेत, अशी माहिती पूना गेस्ट हाऊसचे संचालक किशोर सरपोतदार यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे. कार्यक्रम सर्वांसाठी खुला आहे.