situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : मार्केट यार्ड भागात पोलीस हवालदाराला ट्रकचालक व साथीदारांकडून मारहाण; तीन आरोपींना अटक

Published On:

Team My Pune City – मार्केट यार्ड परिसरात पोलीस हवालदारावर (Pune)ट्रकचालक आणि त्यांच्या साथीदारांनी जोरदार मारहाण केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी मार्केट यार्ड पोलीस ठाण्याच्या पथकाने तिघांना ताब्यात घेतले आहे. अटक करण्यात आलेल्यांची नावे अशी आहेत – सुमीत सुभाष सरकटे (वय ३४, रा. खराडी, नगर रस्ता), अक्षय नानासाहेब शिंदे (वय ३०, रा. तळवडे, ता. संगमनेर, जि. अहिल्यानगर) आणि मनजीत सुभाष कांबळे (वय २८, रा. घोरपडी गाव).

पोलीस हवालदार महेश सुभाष साळुंखे (वय ३९, रा. बिबवेवाडी) यांनी याबाबत तक्रार दिली आहे. हवालदार साळुंखे सध्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात कार्यरत आहेत. त्यांनी सांगितले की, गुरुवारी (१७ ऑक्टोबर) रात्री साडेदहा वाजताच्या सुमारास ते कामावरून बिबवेवाडी येथील घरी निघाले होते.

मार्केट यार्डच्या वखार महामंडळ चौक ते गंगाधाम चौक परिसरात एक ट्रक भरधाव वेगाने निघाला होता, ज्यामुळे गंभीर अपघाताची शक्यता होती. हवालदार साळुंखे यांनी ट्रकचालकाला मार्केट यार्ड प्रवेशद्वार क्रमांक नऊजवळ थांबवले. त्यावेळी परिसरात जमा झालेल्या नागरिकांनी ट्रकचालकावर आणि हवालदारांवर हल्ल्याचा प्रयत्न केला. हवालदारांनी जमाव शांत केला.

Kondhwa: कोंढवा पोलिस कारवाईदरम्यान ड्रग ट्रॅफिकरचा मृत्यू

Talegaon Dabhade: संध्यासूरांत न्हाली ‘इंद्रायणी’ ची दिवाळी

यावरून संतप्त ट्रकचालकाने आपल्या साथीदारांना बोलावले आणि आरोपी अक्षय शिंदे व त्याच्या साथीदारांनी हवालदार साळुंखे यांना हातातील कड्या मारून गंभीर जखमी केले. जखमी हवालदार तातडीने पोलीस नियंत्रण कक्षाला घटनास्थळी माहिती दिली. त्यांना ससून रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले, तर नंतर मार्केट यार्ड पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.

मार्केट यार्ड पोलीस पथकाने पसार झालेल्या आरोपींना अटक केली असून, या प्रकरणी सखोल तपास सुरू आहे.

Follow Us On