गानवर्धन, तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचा संयुक्त उपक्रम
Team My Pune City –गानवर्धन आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशन (Pune)यांच्या संयुक्त विद्यमाने दिल्या जाणाऱ्या स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने आंतरराष्ट्रीय कीर्तीचे तालवादक पंडित रामदास पळसुले यांचा गौरव केला जाणार आहे. 50 हजार रुपये, शाल आणि सन्मानपत्र असे पुरस्काराचे स्वरूप आहे.
स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराचा शुभारंभ 2011 साली करण्यात आला. पद्मविभूषण डॉ. प्रभा अत्रे यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून यंदाचा पुरस्कार वितरण सोहळा शनिवार दि. 20 सप्टेंबर रोजी सायंकाळी 5:30 वाजता टिळक स्मारक मंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. पुरस्काराचे वितरण ज्येष्ठ शास्त्रीय गायक डॉ. अजय पोहनकर आणि सुप्रसिद्ध लेखक, विचारवंत अच्युत गोडबोले यांच्या हस्ते होणार आहे, अशी माहिती गानवर्धनचे अध्यक्ष डॉ. दयानंद घोटकर आणि तात्यासाहेब नातू फाऊंडेशनचे अध्यक्ष शारंग नातू यांनी निवेदनाद्वारे कळविली आहे.
पुरस्कार वितरण सोहळ्यानिमित्त पंडित रामदास पळसुले यांचे स्वतंत्र तबलावादन, निनाद दैठणकर यांचे संतूर वादन आणि डॉ. प्रभा अत्रे यांच्या ज्येष्ठ शिष्या आरती ठाकूर-कुंडलकर यांचे शास्त्रीय गायन होणार आहे. कार्यक्रम सर्व रसिकांसाठी विनामूल्य आहे.
Komkar murder case : कोमकर खून प्रकरणातील चौघे गुजरात सीमेवरून अटक
Talegaon Dabhade: सर्वगुणसंपन्न विद्यार्थी तयार करण्यासाठी विशेष परिश्रम घ्यावे- रामदास काकडे
गानवर्धन आणि स्वरमयी गुरुकुल यांच्या वतीने डॉ. प्रभा अत्रे यांच्या बंदिशींवर घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांचा या कार्यक्रमात पुरस्कार देऊन गौरव केला जाणार आहे.
पंडित व्यंकटेश कुमार, पंडित विनायक तोरवी, डॉ. विकास कशाळकर, पंडिता श्रुती सडोलीकर, पंडिता अश्विनी भिडे-देशपांडे, पंडिता अलका मारुलकर, पंडित आनंद भाटे, पंडित विजय कोपरकर, पंडित रघुनंदन पणशीकर, डॉ. धनंजय दैठणकर, पंडित केशव गिंडे, विदुषी कलापिनी कोमकली, विदुषी देवकी पंडित अशा आंतरराष्ट्रीय कीर्तीच्या कलाकारांना स्वरयोगिनी डॉ. प्रभा अत्रे शास्त्रीय संगीत पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.