Team MyPuneCity – आषाढी वारीचा मंगलमय सोहळा आता पुण्यनगरीत पोहोचला आहे. संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराज (आळंदी) आणि जगतगुरू संत तुकाराम महाराज (देहू) यांच्या पादुकांची पालखी पुणे शहरात (Pune Palkhi News) भक्तिमय वातावरणात दाखल झाली. हजारो पुणेकर नागरिकांनी रस्त्यावर उभे राहून “जय जय राम कृष्ण हरी” च्या जयघोषात पालखींचे जल्लोषात स्वागत केले.
शहरातील संचेती रुग्णालय चौकात पालखी आगमनावेळी आकाशातून हेलिकॉप्टरद्वारे पुष्पवृष्टी करण्यात आली. यावेळी नागरिकांनी आनंदाने (Pune Palkhi News) एकच जल्लोष केला. दोन्ही पालखी रथांची आकर्षक फुलांनी सजावट करण्यात आली होती. पालखी रथाच्या फोटो टिपण्यासाठी भाविकांनी मोबाईल कॅमेरे सरसावले होते.
Maval : मावळमध्ये ९ अजगरांना जीवदान; वन विभाग आणि वन्यजीव रक्षक संस्थेचे कौतुकास्पद कार्य

पालखी सोहळ्याच्या मार्गावर ठिकठिकाणी सामाजिक व राजकीय संस्थांकडून वारकऱ्यांसाठी बिस्किट, चहा, नाश्ता, फराळ आणि फळांचे वाटप करण्यात आले. पुणे शहरात सायंकाळी संचेती चौक मार्गे पालख्यांचे प्रवेश झाल्यानंतर त्या नाना पेठेतील मुक्काम ठिकाणी मार्गस्थ झाल्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे पालखी दर्शन (Pune Palkhi News)

आषाढी वारीच्या निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पुण्यातील भवानी पेठेतील पालखी विठ्ठल मंदिरात जाऊन संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेतले. त्यांनी यावेळी पालखीची (Pune Palkhi News) विधिपूर्वक पूजा केली.
Alandi : माऊली…. माऊलीच्या जयघोषात संत ज्ञानेश्वर माऊलींच्या पालखीचे आळंदीतून प्रस्थान
मुख्यमंत्र्यांसमवेत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, श्री ज्ञानेश्वर महाराज संस्थांचे प्रमुख विश्वस्त योगी निरंजननाथ, गुरु शांतिनाथ, राजेंद्र उमाप, भावार्थ देखणे, पुरुषोत्तम पाटील, रोहिणीताई पवार, चैतन्य लोंढे, पालखी विठ्ठल मंदिर संस्थेचे अध्यक्ष तेजेंद्र कोंढरे, विश्वस्त प्रमोद बेंगरूट, शिवाजीराव जगदाळे, गोरख भिकुले आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले,
“संतश्रेष्ठ श्री ज्ञानेश्वर महाराजांच्या पादुकांचे दर्शन घेण्याचा योग मला आज लाभला. या पालखी सोहळ्यामुळे आपल्या संस्कृतीचे आणि भागवत धर्माचे खरे दर्शन होते. हजारो वारकरी आणि भाविक मोठ्या भक्तिभावाने सहभागी होत असल्याने हा अनुभव अत्यंत समाधान देणारा आहे. मी मनापासून तृप्त झालो आहे.”