situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : किल्ले सिंहगडावर विश्व हिंदू परिषदेतर्फे पालखी सोहळा थाटात

Published On:
Pune


विश्व हिंदू परिषद पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) तर्फे आयोजन ; दुचाकी रॅलीत शिवभक्तांचा सहभाग ; तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन साजरा

Team MyPuneCity – जय भवानी, जय शिवराय… छत्रपती संभाजी महाराज की जयचा अखंड जयघोष… शंख, हलगी आणि पारंपरिक वाद्यांचा गजर… भंडारा व फुलांची उधळण… आणि छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती ठेवलेल्या पालखीवर झालेली पुष्पवृष्टी… अशा शिवमय वातावरणात सिंहगडावर शिवराज्याभिषेक दिनानिमित्त आयोजित पालखी ( Pune) सोहळा थाटात साजरा झाला. तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंती साजरी करण्याकरिता भगवे झेंडे घेवून सिंहगडावर मानवंदना देण्यासाठी शिवभक्तांचा जनसागर लोटला.

Daund-Pune Railway Fire : दौंड-पुणे रेल्वेमध्ये डब्याला आग ; कोणतीही जीवितहानी नाही

विश्व हिंदू परिषद, पुणे व श्री शिवराज्याभिषेक दिन अभिवादन समिती (किल्ले सिंहगड) च्या वतीने तिथीनुसार श्री शिवराज्याभिषेक दिन व धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज जयंतीनिमित्त किल्ले सिंहगड येथे भव्य अभिवादन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले. सोहळ्याचा प्रारंभ रविवारी सकाळी छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅलीने झाला.

राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रराजे भोसले यांच्या हस्ते नरवीर तानाजी मालुसरे यांच्या शिल्पाचे पूजन झाले. यावेळी सरदार हिरोजी इंदलकर यांचे वंशज, समितीचे अध्यक्ष किशोर चव्हाण, उपाध्यक्ष शरद जगताप, विभाग मंत्री केतन घोडके, धनंजय गायकवाड यांसह शिवभक्त उपस्थित होते. अभिवादन सोहळ्याचे यंदाचे हे आठवे वर्ष ( Pune) होते.

Bhushi Dam Overflow : लोणावळा भुशी धरण ओसंडले; पावसाळी पर्यटनाला उत्स्फूर्त सुरुवात, पर्यटकांना सुरक्षेचं आवाहन

छत्रपती राजाराम पूलाजवळील वीर बाजी पासलकर स्मारकपासून आयोजित विराट दुचाकी रॅली विठ्ठलवाडी, हिंगणे, माणिकबाग, धायरी फाटा, किरकटवाडी, खडकवासला, डोणजे, सिंहगड पायथा या मार्गाने सिंहगडावरील वाहनतळ येथे आली. त्यानंतर सिंहगडावरील वाहनतळापासून नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधी व कार्यक्रम मैदानापर्यंत पालखी मिरवणूक काढण्यात आली. पालखी मिरवणुकीत हलगी पथक, केशव शंखनाद पथक, ढोल ताशा पथक आदी सहभागी झाले होते. यावेळी छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराजांच्या मूर्तीस अभिषेक तसेच नरवीर तानाजी मालुसरे यांच्या समाधीचे पूजन आणि सिंहगडावरील मंदिरे व ऐतिहासिक ठिकाणांचे पूजन ( Pune) देखील झाले.

छत्रपती शिवेंद्रराजे भोसले म्हणाले, शिवराज्याभिषेक दिन सोहळा साजरा करण्याकरिता सर्व शिवभक्तांना राजगडावर उपस्थित राहता येते असे नाही. त्यामुळे शिवरायांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या प्रत्येक गड-किल्ल्यावर हा सोहळा साजरा व्हायला हवा. हिंदू साम्राज्य दिन म्हणून हा दिवस साजरा केला जात आहे. स्वराज्य हे आपल्या सगळ्यांचे राज्य आहे. विश्व हिंदू परिषदेच्या माध्यमातून हा सोहळा साजरा होत असून ही कौस्तुकास्पद गोष्ट आहे. गडावर केवळ सोहळा साजरा न करता गड स्वच्छता आणि वृक्षारोपणासारखे सामाजिक उपक्रम होतात, ही चांगली बाब आहे.

किशोर चव्हाण म्हणाले, भारतीय इतिहासातील सुवर्णक्षण म्हणजे शिवराज्याभिषेक सोहळा. आनंदनाम संवत्सर ज्येष्ठ शु. त्रयोदशी नृपशालिवाहन शके १५९६ या दिवशी महाराजांचा रायगडावर राज्याभिषेक झाला. या घटनेने हिंदूचे सार्वभौमत्व पुनप्रस्थापित झाले.,म्हणून हा दिन सर्वांनी हिंदू साम्राज्य दिन म्हणून गौरवीला पाहिजे. या प्रसंगाचे मूक साक्षीदार म्हणजे स्वराज्यातील गड किल्ले होय. त्यामुळे श्री शिवराज्याभिषेक सोहळ्याचे आयोजन प्रत्येक गड किल्ल्यावर झाले पाहिजे. यासाठी किल्ले सिंहगडावर आम्ही हा सोहळा दरवर्षी आयोजित करतो. सर्व शिवभक्तांनी आपापल्या परिसरातील गड-किल्ल्यांवर हा सोहळा आयोजित करावा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कार्यक्रमाचा समारोप सिंहगड पायथ्याजवळ महाप्रसादाने ( Pune) झाला.

Follow Us On