Team My Pune City – यंदाच्या दिवाळीत पुणे आणि पिंपरी-चिंचवडमध्ये फटाक्यांच्या आवाजामुळे ध्वनिप्रदूषणात ( Pune Noise pollution)मोठी वाढ झाल्याचे महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा आवाजाची पातळी अधिक नोंदवली गेली असून, सातारा रस्ता आणि लक्ष्मी रस्ता परिसरात सर्वाधिक ध्वनिप्रदूषण झाल्याचे समोर आले आहे.
मंडळाने दिवाळीच्या दुसऱ्या (२० ऑक्टोबर) आणि तिसऱ्या दिवशी (२१ ऑक्टोबर) पुणे व पिंपरी-चिंचवडमधील १४ ठिकाणी आवाजाची नोंद घेतली. त्यात लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सातारा रस्ता परिसरात दिवसा ९७ डेसिबल आणि रात्री ९३.६ डेसिबल इतकी पातळी नोंदली गेली. गेल्या वर्षी याच ठिकाणी दिवसा ९६ आणि रात्री ८८.९ डेसिबल इतकी पातळी ( Pune Noise pollution) होती.
Talegaon Dabhade News : अविस्मरणीय अनुभूती देणाराएक आगळावेगळा उपक्रम!;रोटरी सिटीचा गेट टुगेदर!
लक्ष्मी रस्ता परिसरात यंदा दिवसा ९६.१ डेसिबल आणि रात्री ९४.४ डेसिबल इतका आवाज झाला. स्वारगेट येथे रात्रीची पातळी ९४.६ डेसिबल नोंदली गेली, जी गेल्या वर्षीपेक्षा तब्बल १० डेसिबलने जास्त होती. कर्वे रस्त्यावर दिवसा ९६.५ डेसिबल आणि रात्री ८९.४ डेसिबल इतकी पातळी नोंदली गेली. खडकीत दिवसा ९४.८ डेसिबल आणि रात्री ९१.२ डेसिबल इतका ( Pune Noise pollution) आवाज झाला.
शनिवारवाडा, येरवडा आणि सारसबाग परिसरात रात्रीची पातळी ८६ ते ९० डेसिबल इतकी होती. पिंपरीत दिवसा ९४.१ डेसिबल तर निगडीत ९३.९ डेसिबल इतकी पातळी ( Pune Noise pollution) नोंदली गेली.
काय आहे नियम?
निवासी भागात दिवसा ध्वनिप्रदूषणाची मर्यादा ५५ डेसिबल आणि रात्री ४५ डेसिबल आहे. वाणिज्य भागात दिवसा ६५ डेसिबल व रात्री ५५ डेसिबल इतकी मर्यादा आहे. मात्र, मंडळाने नोंद घेतलेल्या सर्व ठिकाणी ही मर्यादा मोठ्या प्रमाणात ओलांडली गेली असून, काही ठिकाणी आवाजाची पातळी मर्यादेच्या दुप्पट आढळली ( Pune Noise pollution) आहे.


















