situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune : कला आणि करिअर‌’ विषयावर ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे आयोजन

Published On:

सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी

नव्या शैक्षणिक धोरणाला अनुसरून सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम

ज्येष्ठ व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचा विशेष सन्मान

Team MyPuneCity – नवीन शैक्षणिक धोरणामुळे विद्यार्थ्यांना आवडत्या क्षेत्रात करिअर करण्याची संधी उपलब्ध झाली आहे. दहावी-बारावीनंतर पुढे काय? असा प्रश्न भेडसावणाऱ्या विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांसाठी ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ या उपक्रमाअंतर्गत ‌‘कला आणि करिअर‌’ या विषयावर दि. 13 ते दि. 15 जून या कालावधीत ( Pune) प्रदर्शनी आणि मार्गदर्शन सत्रांचे विनामूल्य आयोजन करण्यात आले आहे.

सांस्कृतिक क्षेत्राशी निगडित आयोजित करण्यात आलेला महाराष्ट्रातील पहिलाच उपक्रम असून आवडीच्या क्षेत्रातील संधी जाणून घेण्यासाठी हा उपक्रम उपयुक्त ठरणार आहे. सांस्कृतिक क्षेत्रातील दिग्गज कलाकारांना ऐकण्याची संधी या निमित्ताने पालक आणि विद्यार्थ्यांना मिळणार आहे, अशी माहिती संवाद, पुणेचे सुनील महाजन, हाऊस ऑफ सक्सेसचे प्रसाद मिरासदार, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍चे संचालक शारंगधर साठे, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे उपाध्यक्ष प्रदीप तुपे, पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर यांनी आज (दि. 11) पत्रकार परिषदेत दिली. तीन दिवसीय ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’ बालगंधर्व कलादालनात आयोजित करण्यात आला आहे. ‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे यंदाचे दुसरे वर्ष आहे.

Alandi: पालखी सोहळ्या सोबत फिरते भांडार गृह

‌‘नेक्स्ट जेन करिअर फेस्ट‌’चे उद्घाटन शुक्रवार, दि. 13 रोजी सकाळी 11 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुरेश गोसावी यांच्या हस्ते होणार आहे. तालयोगी पद्मश्री पंडित सुरेश तळवलकर, नृत्यगुरू सुचेता चाफेकर, भारती विद्यापीठाचे ( Pune) कुलसचिव श्री. जे. जयकुमार यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.

दुपारी 2 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍तर्फे आयोजित मार्गदर्शन सत्रात ‌‘नृत्य कला आणि करियर‌’ नृत्यगुरू शमा भाटे, विदुषी स्मिता महाजन मार्गदर्शन करणार आहेत. दुपारी 4 वाजता पुणे मॅनेजमेंट असोसिएशनतर्फे ‌‘कला, उद्योजकता आणि आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन‌’ या विषयावर चर्चासत्र आयोजित करण्यात आले असून यात सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आंतरविद्याशाखेचे डीन डॉ. संजय तांबट, सृजन आर्ट गॅलरीचे संचालक, सुप्रसिद्ध चित्रकार चारुहास पंडित, पुणे मॅनेजमेंट असोसिएशनचे अध्यक्ष बाळ पाटील यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 6 वाजता सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाअंतर्गत असलेल्या रिसर्च पार्क फाऊंडेशनतर्फे ‌‘नवीन राष्ट्रीय शिक्षण धोरण आणि करियरच्या संधी‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात रिसर्च पार्क फाऊंडेशनचे सीईओ डॉ. अरविंद शाळीग्राम, सीओइपी तंत्रज्ञान विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. सुनील भिरूड, भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग ( Pune) आर्टस्‌‍चे संचालक शारंगधर साठे यांचा सहभाग असणार आहे.

शनिवार, दि. 14 रोजी सकाळी 11 वाजता पुणे विद्यार्थी गृह कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग ॲण्ड टेक्नॉलॉजीतर्फे ‌‘कला करियर आणि एआय टूल्स‌’ या विषयावर आयोजित चर्चासत्रात पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक सुनील रेडेकर, आर्टिफिशिअल इंटेलिजन्स तज्ज्ञ, लेखक अमेय पांगारकर, पुणे विद्यार्थी गृह इंजिनिअरिंग महाविद्यालयातील एआय व डाटा सायन्स प्रमुख डॉ. मीनाक्षी अत्रे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 2 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘कीर्तन : भारतीय पारंपरिक कला व व्यवसाय‌’ या विषयावर ह. भ. प. गणेश भगत महाराज, ह. भ. प. सचिन पवार महाराज बोलणार आहेत. दुपारी 4 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘भारतीय संगीतकलेच्या क्षेत्रात करियर करताना‌’ या विषयावर सुप्रसिद्ध शास्त्रीय गायक डॉ. विकास कशाळकर, सुप्रसिद्ध संगीतकार कौशल इनामदार, प्रसिद्ध बासरीवादक पंडित राजेंद्र कुलकर्णी बोलणार आहेत. सायंकाळी 6 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘नाटक व रंगभूमी क्षेत्रात करियर करण्यातलं नाट्य‌’ या विषयावर सुप्रसिद्ध लेखक, नाटककार, अभिनेते, दिग्दर्शक अभिराम भडकमकर, सुप्रसिद्ध नाट्य दिग्दर्शक व अभिनेते अमित वझे, सुप्रसिद्ध अभिनेते गजानन परांजपे, सुप्रसिद्ध अभिनेते पटकथाकार, दिग्दर्शक किरण यज्ञोपवित यांचा सहभाग असणार आहे.

रविवार, दि. 15 जून रोजी सकाळी 11 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ परफॉर्मिंग आर्टस्‌‍ आयोजित ‌‘फिल्म इंडस्ट्री, ग्लॅमर, करियर आणि बरंच काही‌’ या विषयावर चित्रपट प्रशिक्षक समर नखाते यांची मुलाखत आयोजित करण्यात आली असून त्यांच्याशी लेखक, चित्रपट दिग्दर्शक प्रसाद नामजोशी संवाद साधणार आहेत. दुपारी 1 वाजता भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी कार्यक्रमात भारती विद्यापीठ स्कूल ऑफ फोटोग्राफी ॲण्ड सिनेमॅटोग्राफी विभागाच्या संचालक गीतांजली कुलकर्णी, सुप्रसिद्ध फोटोग्राफर व एआय तज्ज्ञ क्षितिज यादव, सुप्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर सचिन सोनवणे यांचा सहभाग असणार आहे. दुपारी 3 वाजता भारती कला महाविद्यालय कॉलेज ऑफ फाईन आर्ट ॲण्ड स्कूल ऑफ व्हिज्युअल आर्टस्‌‍तर्फे ‌‘चित्रकला, दृश्यकला, शिल्पकला आणि करिअर संधी‌’ या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला असून यात कॉलेज ऑफ फाईन आर्टच्या प्राचार्य डॉ. अनुपमा पाटील, चित्रकार प्रा. राधाकृष्ण पाटील, चित्रकार चंद्रमोहन कुलकर्णी यांचा सहभाग असणार आहे. सायंकाळी 5 वाजता समारोप समारंभ आयोजित करण्यात आला असून कला क्षेत्रात प्रदीर्घ कारकीर्द गाजविणारे, वयाची शतकपूर्ती साजरी करणारे लोकप्रिय व्यंगचित्रकार शि. द. फडणीस यांचे ‌‘कला आणि करियर विषयक विचार ऐकण्याची संधी मिळणार आहे. याच कार्यक्रमात त्यांचा जाहीर सत्कार करण्यात ( Pune) येणार आहे.

Follow Us On