Team My Pune City – सातारा येथे होत असलेल्या 99व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य ( Pune News) अकादमी पुरस्कारप्राप्त लेखक-अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांच्या नावाचा अग्रक्रमाने विचार व्हावा, अशी विनंती महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या अनुवादक संघाने केली आहे. अनुवादक संघांच्या मागणीस महाराष्ट्रातील विविध संस्था, संघटनांसह मराठी वाचनालयांनीही पाठींबा दर्शविला आहे, अशी माहिती लेखक-अनुवादक रवींद्र गुर्जर यांनी आज पत्रकार परिषदेत दिली. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे माजी अध्यक्ष भारत सासणे या प्रसंगी उपस्थित होते.
Talegaon Dabhade: राष्ट्रीय संघाचे स्वयंसेवक नारायण अभ्यंकर यांचे निधन
सातारा येथे होणाऱ्या 99 व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या ( Pune News) अध्यक्षपदाची निवड लवकरच होणार आहे. आतापर्यंत अनेक व्यासंगी, विविध साहित्यिक विषयांतील आघाडीच्या लेखक-लेखकांना अध्यक्ष होण्याचा सन्मान मिळाला आहे. तथापि एकाही अनुवादकाला अद्याप अध्यक्षपद मिळालेले नाही. गेल्या 50 वर्षात अनुवादित साहित्याला खूप मोठा प्रतिसाद मिळत आहे. ग्रंथालयांमधून अनुवादांनाच वाचकांची पसंती दिसते, असे पाहणीत आढळून आले आहे.
Vakad News : वाकडमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी जाळून खाक
सातारा येथे होत असलेल्या संमेलनाच्या अध्यक्षपदासाठी साहित्य अकादमी ( Pune News) पुरस्कार प्राप्त ज्येष्ठ लेखक, अनुवादक चंद्रकांत भोंजाळ इच्छुक आहेत. लेखनाचे अनेक प्रकार त्यांनी हाताळले असून आकाशवाणी, दूरशिक्षण, पत्रकारिता, नाट्य-चित्रपट क्षेत्र, संपादन या विभागातही त्यांची उल्लेखनीय कामगिरी आहे. त्यांची आजवर सुमारे 75 पुस्तके प्रकाशित झाली आहेत. हिंदी, इंग्रजी, आणि उर्दूमधून त्यांनी मराठीत केलेले 60 अनुवाद प्रसिद्ध झालेले आहेत. अनुवादासाठी चंद्रकांत भोंजाळ यांना साहित्य अकादमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे.
कथा, कादंबरी, कविता, दलित, ग्रामीण, विज्ञान तसेच ( Pune News) विनोदी, वैचारिक, ऐतिहासिक साहित्य लिहिणाऱ्या साहित्यिकांची अध्यक्षपदी यापूर्वी निवड झालेली आहे. अनुवादाच्या क्षेत्रात लक्षणीय योगदान देणाऱ्या अनुवादकाची अद्याप अध्यक्षपदी निवड झालेली नाही.
जागतिकीकरणाच्या पुढील टप्प्यात भाषा भगिनींमधील साहित्याच्या आदानप्रदानासाठी अनुवाद प्रक्रिया महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे शतकपूर्तीच्या उंबरठ्यावरील साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी चंद्रकांत भोंजाळ या उत्तम अनुवादकाची निवड व्हावी, अशी अपेक्षा ( Pune News) आहे.
चंद्रकांत भोंजाळ यांचे अनुवाद क्षेत्रातील भरीव कार्य लक्षात घेऊन, यंदाच्या साहित्य संमेलनासाठी अध्यक्ष म्हणून त्यांचा विचार व्हावा, असे आवाहन अखिल भारतीय साहित्य महामंडळाला निवेदनाद्वारे करण्यात आले आहे.
मराठी ग्रंथसंग्रहालय, ठाणे, शब्दसृष्टी, नवी मुंबई, शहादा नगरपंचायत संचलित पूज्य साने गुरुजी वाचनालय, शहादा, अहिल्यानगर जिल्हा वाचनालय, अहिल्यानगर, दादर सार्वजनिक वाचनालय, दादर, व. वा. जिल्हा वाचनालय, जळगाव, कवी केशवसुत स्मारक सार्वजनिक वाचनालय व ग्रंथालय, मालगुंड यांनी अखिल भारतीय साहित्य महामंडळाला पत्र लिहून अनुवादक चंद्रकांत भोंजाळ यांची अध्यक्षपदी निवड करावी, अशी विनंती केली आहे.
संमेलनाच्या इतिहासात अद्यापर्यंत अनुवादकास अध्यक्षपद मिळालेले नाही. लेखकाइतकाच अनुवादकही साहित्यव्यवहारात महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे चंद्रकांत भोंजाळ यांना अध्यक्षपद मिळावे, असे मत भारत सासणे यांनी व्यक्त केले.
चंद्रकांत भोंजाळ यांची अध्यक्षपदाबाबत भूमिका..
साहित्य क्षेत्रातील सर्व प्रकार मी अनुवादित केलेले आहेत. एकाच विचारधारेतील साहित्य अनुवादित केलेले नसल्याने माझे साहित्य एकांगी झालेले नाही. हिंदी साहित्य क्षेत्रातील अमृता प्रितम, जितेंद्र भाटिया, मोहन राकेश, भिष्म साहनी, अबिद सुर्की, आणि उर्दूतील मंटो यांचे साहित्य मराठीत अनुवादित केले आहे. मी विविध साहित्य प्रकारातील चारशेपेक्षा जास्त कथा अनुवादित केल्या आहेत. माझ्यामते हा अनुवादाच्या क्षेत्रातील विक्रम असावा. मराठीतील साहित्य राष्ट्रीय पातळीवर पोहोचण्यासाठी भविष्यात मराठी भाषेतील साहित्याचा हिंदी किंवा इंग्रजीत अनुवाद करण्याचा मानस ( Pune News) आहे.