Team MyPuneCity : बुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ( Pune News ) भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक, पुणे स्टेशन परिसरात दर्शनासाठी हजारो अनुयायी पुण्यासह राज्यभरातून येण्याची शक्यता आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि जनतेच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी तात्पुरते वाहतूक बदल लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
Pune : सहकार भारती प्रशिक्षण संस्थेच्या अध्यक्षपदी संजय बिर्ला; उपाध्यक्षपदी शरद जाधव
पोलीस उपआयुक्त (वाहतूक) अमोल झेंडे यांनी दिलेल्या माहितीनुसार, सोमवार १२ मे २०२५ रोजी मध्यरात्री १२ वाजल्यापासून ते दुसऱ्या दिवशी रात्री १२. ०० वाजेपर्यंत खालीलप्रमाणे वाहतूक बदल लागू असतील:
वाहतूकबंदी:
- डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोड ते साधू वासवानी रोड या दिशेने जाणारी सर्व वाहतूक बंद करण्यात येणार आहे.( Pune News )
Pushpalata D. Y. Patil Hospital: आंबी येथे लवकरच सुरु होणार भव्य ‘पुष्पलता डी. वाय. पाटील हॉस्पिटल’
पर्यायी मार्ग:
- वाहनचालकांनी बोलाई चौक – पुणे स्टेशन चौक – अलंकार चौक मार्गे इच्छित स्थळी जाणे अपेक्षित आहे.
या वाहतूक बदलांमुळे सामान्य जनतेस अडचण होऊ नये यासाठी अत्यावश्यक सेवांच्या (पोलीस, रुग्णवाहिका, अग्निशमन) वाहनांना यामधून वगळण्यात आले आहे.
पोलीस प्रशासनाने नागरिकांना आवाहन केले आहे की, त्यांनी पर्यायी मार्गांचा वापर करून सहकार्य करावे व वाहतूक सुरळीत ठेवण्यास मदत करावी. यामुळे कोणत्याही संभाव्य ( Pune News ) बुद्ध पौर्णिमेनिमित्त आंबेडकर स्मारक परिसरातील वाहतूक मार्गात तात्पुरते बदलवाहतूक कोंडीला अटकाव करता येईल.