Team My pune city –दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेडच्या अध्यक्षपदी तन्वीर पी. इनामदार यांची ,उपाध्यक्षपदी ऍड. आयुब शेख ( Pune News) यांची बिनविरोध निवड झाली आहे.पुण्यातील मुख्य कार्यालयात १८ ऑगस्ट २०२५ रोजी झालेल्या संचालक मंडळाच्या बैठकीत ही निवड करण्यात आली.
तनवीर इनामदार हे माहिती- तंत्रज्ञान विषयातील तज्ञ असून एड.आयुब शेख हे सामाजिक, राजकीय क्षेत्रात कार्यरत आहेत. या निवडीनंतर सर्व संचालक मंडळाने ( Pune News) त्यांचे अभिनंदन केले. दि मुस्लिम को-ऑपरेटिव्ह बँक लिमिटेड पुणे ही १९३१ साली स्थापन झालेली बँक असून राज्यभरात २३ शाखा आहेत.
‘सर्वसामान्यांची बँक हा बँकेचा नावलौकिक पुढे कायम ठेवू आणि बँकेला आणखी प्रगतीपथावर नेऊ’, असे तन्वीर इनामदार आणि एड.आयुब शेख यांनी यावेळी सांगितले. बँकेद्वारे आज प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकात ही माहिती देण्यात ( Pune News) आली.



















