situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune News : पुणे ठरणार प्रगत उत्पादनाचे हब

Published On:

Team My Pune City – महाराष्ट्राला प्रगत उत्पादन क्षेत्रात जागतिक स्तरावर ( Pune News) नेण्यासाठी राज्य सरकारने महत्त्वाकांक्षी योजना आखली आहे. पुणे हे उत्पादननिर्मितीचे प्रमुख केंद्र असून, त्याला चालना देण्यासाठी शासनाकडून विशेष परिसंस्था उभारली जात आहे. नवी मुंबईला ‘डेटा कॅपिटल’ म्हणून ओळख मिळाल्याने, या दोन्ही शहरांना जोडणारे ‘नवोन्मेषी शहर’ (Innovation City) उभारण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली.

नीती आयोगाकडून ‘प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक नेतृत्वासाठी भारताच्या उत्पादन क्षेत्राचे
पुनर्रचना आराखड्याचे उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते बुधवारी झाले. त्या वेळी ते बोलत होते.
उपमुख्यमंत्री अजित पवार, नगरविकास राज्यमंत्री माधुरी मिसाळ, नीती आयोगाचे मुख्य
कार्यकारी अधिकारी बी. व्ही. आर. सुब्रह्मण्यम्, मुख्य आर्थिक सल्लागार डॉ. प्रवीण परदेशी, नीती
आयोगाच्या देबजानी घोष, सीआयआयचे महासंचालक चंद्रजीत बॅनर्जी या वेळी उपस्थित होते.


मॅन्युफॅक्चरिंग मिशनची घोषणा ( Pune News)
फडणवीस म्हणाले की, देशाला प्रगत उत्पादन क्षेत्रात पुढे नेताना महाराष्ट्र आघाडीवर राहील. यासाठी राज्याचे ‘मॅन्युफॅक्चरिंग मिशन’ सुरू करण्यात येणार असून, आवश्यक सुविधा निर्माण करण्याचे काम हाती घेतले जाईल. कृत्रिम बुद्धिमत्ता (AI), कम्युटिंग आणि सेमीकंडक्टर या क्षेत्रांत महाराष्ट्राला मोठी संधी असल्याचे त्यांनी नमूद केले.

Purandar Airport : पुरंदर विमानतळासाठी जमिनीची मोजणी अंतिम टप्प्यात; शेतकऱ्यांकडून १४८ हेक्टर अतिरिक्त जमीन देण्याची तयारी


पुण्याची निर्णायक भूमिका ( Pune News)
नीती आयोगाच्या ‘प्रगत उत्पादन क्षेत्रातील जागतिक नेतृत्वासाठी भारताच्या उत्पादन क्षेत्राचे पुनर्रचना आराखड्याचे’ उद्घाटन फडणवीस यांच्या हस्ते झाले. या वेळी त्यांनी सांगितले की, पुणे प्रगत उत्पादन आणि संशोधनासाठी महत्त्वाचे केंद्र ठरणार आहे. नीती आयोगाने सुचविलेल्या ‘ग्लोबल इन्स्टिट्यूट ऑफ अॅडव्हान्स मॅन्युफॅक्चरिंग’ स्थापन करण्याचा प्रस्ताव राज्य सरकारने स्वीकारला असून, या संस्थेद्वारे संशोधन, कौशल्यविकास आणि उद्योग यांना एकत्र आणले जाणार आहे.


उद्योजकता आणि सुधारणा ( Pune News)
‘इज ऑफ डुइंग बिझनेस’ अंतर्गत ‘कृती दल’ (Task Force) स्थापन करण्यात आले असून, त्याअंतर्गत १०० सुधारणा राबविल्या जात आहेत. छत्रपती संभाजीनगरला ‘ईव्हीची राजधानी’ करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. इनोव्हेशन सिटीसाठी अनेक उद्योजक आणि जागतिक कंपन्यांशी चर्चा सुरू असल्याचेही फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Vadgaon Maval: मावळ तालुक्यात ५ पक्ष एकत्र — ‘महाविकासआघाडी’ म्हणून स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लढविणार


शिक्षण आणि तंत्रज्ञान केंद्र
पुण्यात जागतिक दर्जाचे ‘ग्लोबल फ्रंटियर टेक्नॉलॉजी इन्स्टिट्यूट’ उभारण्याचा प्रयत्न सुरू आहे. तसेच ‘एड्युसिटी’ प्रकल्पांतर्गत १२ आंतरराष्ट्रीय विद्यापीठे स्थापन होणार असून, त्यापैकी सात विद्यापीठे आधीच सहभागी झाली आहेत. इनोव्हेशन सिटी आणि एड्युसिटी हे एकमेकांना पूरक ठरतील, असेही ( Pune News) त्यांनी सांगितले.

Follow Us On