situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune NCP : पुण्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे दोन शहराध्यक्ष, पूर्व विभागासाठी सुनील टिंगरे तर पश्चिम विभागासाठी सुभाष जगताप

Published On:
Pune NCP

Team MyPuneCity  – राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पुणे शहर संघटनेत (Pune NCP) महत्त्वाचे बदल करण्यात आले असून, शहराच्या पूर्व विभागासाठी माजी आमदार सुनील टिंगरे तर पश्चिम विभागासाठी माजी सभागृह नेते सुभाष जगताप यांची अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. ही माहिती हडपसरचे आमदार चेतन तुपे यांनी पत्रकारांशी बोलताना दिली.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या आदेशानुसार हा निर्णय घेण्यात आला आहे. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर शहर पातळीवरील संघटनात्मक बळकटीसाठी (Pune NCP) ही नियुक्ती करण्यात आल्याचे तुपे यांनी सांगितले.

Pimpri Chinchwad: तळेगाव येथे तीन सराईत पिस्तूल तस्करांना अटक; पाच पिस्तूल, 20 काडतुसे जप्त

पुणे शहराच्या पूर्व विभागात कसबा, हडपसर, वडगावशेरी आणि पुणे कॅन्टोन्मेंट या विधानसभा मतदारसंघांचा समावेश असून, या भागासाठी माजी आमदार सुनील टिंगरे यांच्यावर अध्यक्षपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर पर्वती, खडकवासला, कोथरूड आणि शिवाजीनगर या पश्चिम विभागासाठी सुभाष जगताप यांची निवड झाली आहे.

शहर कार्याध्यक्षपदी प्रदीप देशमुख (Pune NCP) यांची फेरनिवड करण्यात आली असून, दुसरे कार्याध्यक्ष म्हणून अक्रूर शेठ कुदळे यांची निवड करण्यात आली आहे. तसेच पूर्व पुण्यासाठी माजी नगरसेविका रूपाली ठोंबरे पाटील आणि हाजी फिरोज शेख यांची कार्याध्यक्ष म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

या नव्या संघटनात्मक रचनेमुळे पक्ष अधिक सक्षम होईल आणि आगामी निवडणुकीत चांगले यश मिळेल, असा विश्वास आमदार चेतन तुपे यांनी व्यक्त केला.

Follow Us On