situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune: राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे दीक्षांत संचलन दिमाखात संपन्न; पहिल्यांदाच १७ महिला कॅडेट्स दीक्षांत

Published On:
---Advertisement---

Team MyPuneCity – राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए), खडकवासला येथे प्रशिक्षण घेत असलेल्या १४८व्या कोर्सचे दीक्षांत संचलन शुक्रवारी (३० मे २०२५) सकाळी खेत्रपाल संचलन मैदानावर अत्यंत शिस्तबद्ध व भव्य वातावरणात पार पडले. या वेळी एकूण १३४१ कॅडेट्सनी संचलनात भाग घेतला. त्यापैकी ३३६ कॅडेट्स दीक्षांत झाले. विशेष बाब म्हणजे,या संचलनात प्रबोधिनीच्या इतिहासात प्रथमच १७ महिला कॅडेट्स दीक्षांत झाले असून, ही संस्था आणि सशस्त्र दलांसाठी एक ऐतिहासिक व परिवर्तनशील घटना ठरली आहे.

या दीक्षांत संचलनाची पाहणी मिझोरामचे राज्यपाल जनरल (डॉ.) व्ही. के. सिंग (सेवानिवृत्त) यांनी केली. लेफ्टनंट कर्नल प्रविण कुमार तिवारी (ॲडज्युटंट) यांनी ‘रिलायंट रॉबिन’ या घोड्यावरून संचलनाचे सूत्र हाताळले, तर ‘जी’ स्क्वॉड्रनचा अकॅडमी कॅडेट कॅप्टन उदयवीर सिंह नेगी याने संचलनाचे नेतृत्व केले.

Wakad: गहाळ झालेले १३७ मोबाईल फोन मूळ मालकांना परत ;वाकड पोलिसांची कामगिरी

राष्ट्रपती पदके पुढीलप्रमाणे प्रदान करण्यात आली :

  • सुवर्णपदक : बीसीए प्रिन्स राज
  • रौप्यपदक : एसीसी उदयवीर सिंह नेगी
  • कांस्यपदक : बीसीसी तेजस भट्ट

या भव्य संचलनात चेतक हेलिकॉप्टर्स, सुपर डिमोना मोटरायझ्ड ग्लायडर्स आणि सुखोई-३० लढाऊ विमानांनी हवेतून अभिवादन केले.


‘गोल्फ स्क्वॉड्रन’ला यंदाचा चीफ्स ऑफ स्टाफ बॅनर प्रदान करण्यात आला.

हा कार्यक्रम पालक, मान्यवर, शालेय विद्यार्थी, नागरिक, तसेच सेवारत व सेवानिवृत्त लष्करी अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत संपन्न झाला. राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीचे हे दीक्षांत संचलन केवळ शिस्त, धैर्य आणि नेतृत्वाचे प्रतीक नव्हते, तर नव्या सैनिकी इतिहासाचा प्रारंभ करणारा महत्त्वाचा क्षण ठरला.

Follow Us On