जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण
ध्वजगीतातून देशाचा गौरवशाली इतिहास जागविला जातो, (Pune)उर्जा संचारते. अशा गीतांद्वारेच सैन्याचेही मनोबल वाढविण्यासह मदत होते. त्याचप्रमाणे एकता, शिस्त, राष्ट्रसन्मान आणि उर्जानिर्मितीसह देशप्रेमाचा जागर अशा स्फूर्तीदायक गीतांमधून होतो, असे प्रतिपादन एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट यांनी केले.
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीतर्फे शालेय तसेच कनिष्ठ महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी आयोजित जिल्हास्तरीय ‘अमृतप्रभा समूहगान’ स्पर्धेचे पारितोषिक वितरण आज (दि. 6) एअर मार्शल (निवृत्त) प्रदीप बापट यांच्या हस्ते झाले. त्या वेळी ते बोलत होते. सोमवार पेठेतील संस्थेच्या आबासाहेब अत्रे प्रशालेच्या सभागृहात कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. प्रशस्तीपत्र आणि सन्मानचिन्ह असे पुरस्काराचे स्वरूप होते.
Alandi News : वनक्षेत्रात औषधे गोळ्या टाकल्या वनविभागाच धडक कारवाई
दि रास्ता पेठ एज्युकेशन सोसायटीचे मानद अध्यक्ष संजीव ब्रह्मे, कार्यकारी मंडळ मानद सदस्य भारत वेदपाठक तसेच स्पर्धेचे परीक्षक संजय गोगटे, भरत कामत, मोहन पारसनीस, सुयोग कुंडलकर, रेवती कामत, आरती कुंडलकर मंचावर होते. स्पर्धेसाठी यंदा ‘ध्वजगीत/झेंडागीत’ असा विषय देण्यात आला होता. स्पर्धेचे यंदाचे तिसरे वर्ष आहे. या समूहगीत स्पर्धेसाठी पाचवी ते सातवी, आठवी ते दहावी व कनिष्ठ महाविद्यालय अशा तीन गटांमध्ये 65 शाळा सहभागी झाल्या होत्या. स्पर्धेचे संयोजन डॉ. भारती एम. डी., संतोष अत्रे व प्रसाद भडसावळे यांनी केले.
‘ऑपरेशन सिंदूर’मुळे आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात
‘ऑपरेशन सिंदूर’च्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत संकल्पना प्रत्यक्षात आणली गेली असे सांगून एअर मार्शल प्रदीप बापट म्हणाले, ‘ऑपरेशन सिंदूर’ दरम्यान ब्रह्मोस, आकाश अशी भारतीय बनावटीची क्षेपणास्त्रे वापरली गेली यातून भारतीय तंत्रज्ञान उत्तम आहे हे सिद्ध झाले आणि या कामगीरीतून देशाच्या तिरंग्याचा मान राखला जात तो डौलाने उंचचउंच फडकत आहे. आजचे विद्यार्थी देशाचे भविष्य आहेत. विद्यार्थ्याने कोणत्याही क्षेत्रात कारकीर्द घडविली तरी देशसेवेसाठी सदैव तत्पर रहावे.
परीक्षकांच्या वतीने भरत कामत, सुयोग कुंडलकर यांनी मनोगत व्यक्त केले. स्पर्धेला कशापद्धतीने सामोरे जावे याविषयी त्यांनी मार्गदर्शन केले. स्पर्धेत प्रथम आलेल्या तीनही गटातील संघांनी गीत सादरीकरण केले. मान्यवरांचे स्वागत संजीव ब्रह्मे, भारत वेदपाठक यांनी केले.
स्पर्धेचा सविस्तर निकाल
इयत्ता 5वी ते 7वी
प्रथम क्रमांक : भारतीय विद्या भवन परांजपे विद्यालय (कोथरूड)
द्वितीय क्रमांक : सरहद सी. बी. एस. ई. इंग्लिश मिडीयम स्कूल (कात्रज, पुणे)
तृतीय क्रमांक : सह्याद्री नॅशनल स्कूल ( वारजे माळवाडी )
उत्तेजनार्थ : जयवंत पब्लिक स्कूल (हडपसर), एंजल्स हायस्कूल (लोणी काळभोर)
इयत्ता 8वी ते 10वी
प्रथम क्रमांक : माधव सदाशिव गोळवलकर गुरुजी माध्यमिक विद्यालय (टिळक रस्ता)
द्वितीय क्रमांक: न्यू इंडिया मिडीयम स्कूल (कोथरूड)
तृतीय क्रमांक: एंजल्स हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेज (लोणी काळभोर)
उत्तेजनार्थ : सरहद ग्लोबल स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज (निंबाळकरवाडी, कात्रज)
इनोव्हेरा स्कूल (हडपसर), एच. एच. सी. पी., हुजूरपागा हायस्कूल (लक्ष्मी रस्ता)
कनिष्ठ महाविद्यालय गट
Bali Pass Trek: हिमशिखरावरील स्वर्गीय अनुभूती देणारा बाली पास ट्रेक !!!
प्रथम क्रमांक : एच.एच.सी.पी.हुजूरपागा हायस्कूल (नारायण पेठ)
द्वितीय क्रमांक : विमलाबाई गरवारे प्रशाला
तृतीय क्रमांक : म.ए.सो. राणी लक्ष्मीबाई मुलींची सैनिकी शाळा