Team My Pune City -गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रसारित करण्यात (Pune)आलेल्या ‘तूच माझा फ्रेंड आहेस बाप्पा..मोरया’ या गीतातून सामाजिक प्रबोधनात्मक संदेश देण्यात आला आहे.
समाजमाध्यमावर या गीताचे लोकार्पण खासदार प्रा. मेधा कुलकर्णी यांच्या हस्ते करण्यात आले. या अनोख्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. खासदार कुलकर्णी यांच्या निवासस्थानी कार्यक्रम झाला.
कवी वलय मुळगुंद यांनी हे गीत लिहिले असून बालकलाकार आर्चिस नाडकर याने गायले आहे तर प्रसिद्ध संगीतकार उदय रामदास यांनी गीतसंगीतबद्ध केले आहे. प्रशांत शितुत यांची निर्मिती आहे.
Pune: ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती
Atharvashirsha Pathan : श्रीसमर्थ सेवा समिती व श्री योगीराज सेवा फाउंडेशनच्यावतीने बालगोपालांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन
मोबाईलच्या अतिवापराने लहान मुलांमध्ये अनेक समस्या उद्भवू लागल्या आहेत. गणेशोत्सवाच्या निमित्ताने सामाजिक बांधिलकीच्या दृष्टीने या गीताची निर्मिती करण्यात आली असून या गीताद्वारे मुलांनी मोबाईपासून दूर रहावे असा सामाजिक संदेश देण्यात आला आहे, असे उदय रामदास यांनी सांगितले.