Team My Pune City –पुण्यातील जैन बोर्डिंग जमीन व्यवहार प्रकरणावरून शिवसेना (शिंदे गट) नेते आणि माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी केंद्रीय मंत्री आणि भाजप खासदार मुरलीधर मोहोळ यांच्यावर आरोप केल्याने राजकीय वातावरण तापले आहे. या पार्श्वभूमीवर मोहोळ यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतल्याने नव्या चर्चांना उधाण आले आहे.
केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ म्हणाले,पुण्यातील मॉडेल कॉलनीमधील जैन समाजाच्या जमीन व्यवहाराप्रकरणावरुन रविंद्र धंगेकर रोज नवनवीन आरोप करत आहेत. यावर आपण आधीच भूमिका मांडली आहे.परंतू आता आपल्यावर वैयक्तिक पातळीवर टीका केली जात आहे.लोकसभा, विधानसभा निवडणूक झाली आहे. राजकीय नैराश्यातून आपल्यावर वैयक्तिक टीका केली जात असल्याचा आरोप केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी केला आहे. ज्यांना राजकारणात कोणी विचारत नाही अशांच्या आरोपांना काय उत्तर देणार असे मोहोळ यांनी म्हटले आहे.
Eknath Shinde: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा मध्यरात्री दिल्ली दौरा; मोदी -शहांची भेट घेणार
Maval: पवना कृषक सेवा सहकारी संस्थेच्या उपाध्यक्षपदी बाळू आखाडे यांची निवड
रवींद्र धंगेकर – मोहोळ यांच्या वादाने पुण्यातील राजकीय वातावरण तापलेले आहे. अशातच केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी वर्षा निवासस्थानी जाऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. या भेटीत मोहोळ आणि फडणवीस यांच्यात नेमकी काय चर्चा झाली हे कळलेले नाही. यावर आता उलटसुलट चर्चांना सुरुवात झाली आहे.




















