situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Mishap : नाना पेठेत विजेच्या धक्क्याने सात वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू; सहकारी मुलगा गंभीर जखमी

Published On:

Team MyPuneCity – शहरातील नाना पेठेतील डोके तालीम परिसरात रविवारी दुपारी विजेच्या थरारक अपघातात सात वर्षांच्या सायली गणेश डांबे हिचा दुर्दैवी मृत्यू (Pune Mishap) झाला. तिच्यासोबत खेळत असलेला रुद्र शिळीमकर (वय ७) हा मुलगा गंभीर जखमी झाला असून दोन्ही पाय निकामी झाले आहेत. या हृदयद्रावक घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

ही दुर्घटना (Pune Mishap) रविवारी दुपारी नाना पेठेतील डोके तालीमजवळ घडली. सायली डांबे आणि रुद्र शिळीमकर हे दोघे रस्त्यावर खेळत होते. खेळता खेळता सायलीचा हात रस्त्यावरून गेलेल्या उघड्या वायरला लागला. ती तिला विजेचा तीव्र धक्का बसला आणि ती जागीच बेशुद्ध झाली. तिच्यासोबत असलेल्या रुद्रलाही त्या वायरचा शॉक बसला आणि तो गंभीर जखमी झाला.

त्यानंतर तात्काळ परिसरातील नागरिकांनी दोघांना ससून रुग्णालयात दाखल केले. मात्र, डॉक्टरांनी सायलीला मृत घोषित केले. तर रुद्रवर सध्या उपचार सुरू असून, प्राथमिक तपासणीत त्याचे दोन्ही पाय निकामी झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या धक्कादायक घटनेमुळे (Pune Mishap) परिसरात संतापाची लाट पसरली आहे. स्थानिक नागरिकांनी महावितरण विभागाच्या निष्काळजीपणावर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. रस्त्यावर उघड्या केबल्स ठेवणे ही गंभीर दुर्लक्षाची बाब असून, त्या निष्काळजीपणाचा फटका दोन निष्पाप मुलांना बसला आहे. एक मुलगी जीव गमावून बसली, तर दुसऱ्या मुलाचे संपूर्ण आयुष्य अंधारात गेले.

घटनेची माहिती (Pune Mishap) मिळताच पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली असून पुढील तपास सुरू केला आहे. दरम्यान, महावितरणच्या संबंधित अधिकाऱ्यांवर त्वरित गुन्हे दाखल करून कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

Follow Us On