Team My pune city – सध्या गर्दीच्या वेळेत ( Pune Metro) (सकाळी ९ ते ११, दुपारी ४ ते रात्री ८) दर ७ मिनिटाला १ ट्रेन अशी सेवा पुणे मेट्रोतर्फे पुरविण्यात येत आहे. आता १५ ऑगस्टपासून पुणे मेट्रो गर्दीच्या वेळेस दर ६ मिनिटाला सेवा पुरविण्यात येणार आहे. विना गर्दीच्या वेळी मात्र दर १० मिनिटाला एक ट्रेन असणार आहे.
Pratibha College : प्रतिभा कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी अग्निशामक दलात राबविली सायबर जनजागृती मोहीम
महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी याबाबत माहिती दिली. सद्या पुणे मेट्रोच्या दोन्ही मार्गिका मिळून ४९० फेऱ्यांव्दारे मेट्रो सेवा पुरवत आहे. दर ६ मिनिटाला ट्रेन सेवा यामुळे अधिक ६४ फेऱ्या वाढणार आहे. १५ ऑगस्टपासून एकूण फेऱ्या ५५४ होणार आहेत. अधिकच्या ६४ फेऱ्यांमुळे प्रवाशांना गर्दीचा सामना करावा लागणार ( Pune Metro) नाही.
Pune News : विद्यार्थ्यांनी अभ्यासाबरोबर शारिरीक क्षमतेवर लक्ष द्यावे- दत्तात्रय पाष्टे
दर ६ मिनिटाला ट्रेन चालवण्यास मेट्रो दोन महिन्यापासून प्रयत्नशिल होती. त्या अनुषंगाने अनेकवेळा चाचण्या घेण्यात आल्या. सर्व तांत्रिक बाबींची पुर्तता झाल्यानंतर १५ ऑगस्टपासूनदर ६ मिनिटाला मेट्रो सोडण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जुलै २०२५ या महिन्यामध्ये मेट्रोला चांगला प्रतिसाद मिळाला असून दैनंदिन प्रवासी संख्या सरासरी १ लाख ९२ हजार पर्यंत वाढली आहे. ऑगस्ट, २०२५ मध्येप्रवासी संख्येत निरंतर वाढ होताना दिसत आहे. आज पर्यंत ऑगस्ट २०२५ मध्ये प्रवाशांची सरासरी संख्या २ लाख १३ हजार ६२० निदर्शनास आली असल्याचेही हर्डीकर ( Pune Metro) म्हणाले.