situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro: गर्दी व गैरसोय टाळण्यासाठी पुणे मेट्रोकडून गणेशोत्सव काळात प्रवाशांसाठी विशेष सूचना

Published On:
pune metro

Team My Pune City – पुणे शहरातील मध्यवस्तीमध्ये होणाऱ्या (Pune Metro)गणेशोत्सवाच्या प्रचंड गर्दीच्या पार्श्वभूमीवर पुणे मेट्रोकडून प्रवाशांसाठी विशेष सूचना जाहीर करण्यात आल्या आहेत. स्वारगेट, मंडई आणि कसबा पेठ ही तीन महत्त्वाची स्थानके आता पूर्ण क्षमतेने कार्यान्वित झाल्याने यावर्षी मेट्रोच्या प्रवाशांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढण्याची शक्यता आहे. दैनंदिन सरासरी २ लाख १५ हजार प्रवाशांची संख्या असणाऱ्या पुणे मेट्रोवर गणेशोत्सव काळात तब्बल ५ लाखांहून अधिक प्रवासी होण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे गर्दीचा ताण कमी करण्यासाठी व नागरिकांना सुरक्षित प्रवासाची सुविधा देण्यासाठी महामेट्रोकडून या सूचना देण्यात आल्या आहेत.

महामेट्रोकडून दिलेल्या माहितीनुसार, पिंपरी चिंचवड मनपा स्थानक ते स्वारगेट स्थानक (मार्गिका १) या मार्गाने येणाऱ्या भाविकांनी कसबा पेठ स्थानकाचा वापर करून पुढील प्रवास पायी करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर वनाझ ते रामवाडी मार्गिका वापरणाऱ्या प्रवाशांनी दर्शनासाठी पुणे महानगरपालिका, छत्रपती संभाजी उद्यान किंवा डेक्कन जिमखाना स्थानक येथे उतरावे, असे सांगण्यात आले आहे.

Pune: ‘दगडूशेठ’ गणपतीसमोर ३५ हजार महिलांचे अथर्वशीर्ष पठण व महाआरती

Atharvashirsha Pathan : श्रीसमर्थ सेवा समिती व श्री योगीराज सेवा फाउंडेशनच्यावतीने बालगोपालांसाठी गणपती अथर्वशीर्ष पठणाचे आयोजन

विशेष म्हणजे, मध्यवस्तीत असलेल्या मंडई स्थानकात अतिगर्दी होण्याची शक्यता लक्षात घेऊन प्रवाशांनी या स्थानकात उतरणे टाळावे, असे आवाहन पुणे मेट्रोने केले आहे. यामुळे गर्दीचे नियोजन होऊन सेवेत अडथळा येणार नाही. तिकीट खिडकीवरील रांगा टाळण्यासाठी डिजिटल तिकीट, व्हॉट्सअॅप तिकीट आणि एक पुणे कार्ड वापरण्याचेही नागरिकांना सुचविण्यात आले आहे.

तसेच, वृद्ध, महिला आणि गरजू प्रवाशांना लिफ्टसाठी प्राधान्य देणे, तर इतरांनी एस्केलेटर व जिन्यांचा वापर करणे आवश्यक आहे. स्थानकांच्या प्रवेशद्वारांवर व बाहेर पडताना प्रवाशांनी रांगेने हालचाल करावी आणि गोंधळ टाळावा, असेही आवाहन करण्यात आले आहे.

Follow Us On