situs toto

https://trapstartstore.com/

https://www.kampfestcdmx.com/

https://turfdraintiles.com/

slot bet 200

https://daftarpgatoto.com/

https://aqwch.com/

mnctoto

https://mnctotologin.org/

mahjong ways

judi bola

https://situsrans4d.com/

https://mnctototogel.com/

situs pgatoto

https://aromadecafecolombiano.com/

Pune Metro: मेट्रो ने पार केला दहा कोटी प्रवासी संख्येचा टप्पा

Published On:
pune metro

Team My Pune City – पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरांसाठी (Pune Metro) सार्वजनिक वाहतुकीचे नवे पर्व सुरू करणाऱ्या पुणे मेट्रोने एक ऐतिहासिक आणि महत्त्वाचा टप्पा गाठला आहे. आपल्या सेवेच्या सुरुवातीपासून, ६ मार्च २०२२ ते ४ ऑक्टोबर २०२५ पर्यंत मेट्रोने १० कोटी प्रवाशांची यशस्वीरित्या वाहतूक केली आहे.

ही कामगिरी पुणे आणि पिंपरी-चिंचवडकरांनी मेट्रोला दिलेल्या प्रचंड आणि सातत्याने वाढणाऱ्या प्रतिसादाचे द्योतक आहे. महामेट्रोचे व्यवस्थापकीय संचालक श्रावण हर्डीकर यांनी या अभूतपूर्व यशाबद्दल पुणे आणि पिंपरी-चिंचवडच्या नागरिकांचे आभार मानले. “पुणे मेट्रो ही केवळ एक वाहतूक व्यवस्था नाही, तर पुणेकरांची ‘आपली मेट्रो’ बनली आहे,” असे ते म्हणाले. या १० कोटी प्रवाशांमध्ये प्रत्येक पुणेकराचा विश्वास आणि सहभाग आहे. मेट्रोमुळे वेळेची बचत, आरामदायक प्रवास आणि पर्यावरणपूरक प्रवासाचा पर्याय मिळाला असून, भविष्यात आम्ही उर्वरित टप्पे पूर्ण करून आणि अधिक चांगल्या सेवा देऊन पुणेकरांची सेवा करण्यासाठी कटिबद्ध आहोत, असे त्यांनी स्पष्ट केले.

Pune: जागतिक पातळीवर सांस्कृतिक राष्ट्रकुलाचा विचार व्हावा -विनय सहस्रबुद्धे


Lonavala News : लोणावळा व तळेगाव नगराध्यक्षपदाच्या आरक्षण पदाची आज होणार सोडत  ; इच्छुक उमेदवारांत उत्सुकतेचा शिखरबिंदू

पुणे मेट्रोच्या सेवेत टप्प्याटप्प्याने झालेल्या विस्तारामुळे प्रवासी संख्येत सातत्याने मोठी वाढ झाली आहे. ६ मार्च २०२२ रोजी पहिला टप्पा (PCMC ते फुगेवाडी आणि वनाझ ते गरवारे महाविद्यालय) मा. पंतप्रधान यांच्या हस्ते सुरू झाल्यावर अंदाजित २०,००० – ३०,००० दैनंदिन प्रवासी संख्या होती. त्यानंतर १ ऑगस्ट २०२३ रोजी झालेल्या महत्त्वपूर्ण विस्तारामध्ये (फुगेवाडी ते दिवाणी न्यायालय आणि गरवारे महाविद्यालय ते रुबी हॉल क्लिनिक) दैनंदिन प्रवाशांचा आकडा १,००,००० ते १,१०,००० पर्यंत पोहोचला.

६ मार्च २०२४ रोजी पूर्व-पश्चिम कॉरिडोरची पूर्णता (रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी) झाल्यावर ही संख्या १,२०,००० ते १,३०,००० झाली आणि २९ सप्टेंबर २०२४ रोजी भूमिगत मार्गाची पूर्णता (जिल्हा न्यायालय ते स्वारगेट) झाल्यावर अंदाजित १,६०,००० ते २,००,००० प्रवाशांनी मेट्रोने प्रवास करण्यास सुरुवात केली. पुणे मेट्रोने १० कोटी प्रवाशांचा टप्पा ओलांडून केवळ एक आकडेवारी पूर्ण केलेली नाही, तर पुणे आणि पिंपरी-चिंचवड महानगरांच्या भविष्यातील विकासाची पायाभरणी केली आहे. जलद वाहतुकीमुळे व्यावसायिक केंद्रे, शैक्षणिक संस्था आणि आयटी हबपर्यंत पोहोचणे सोपे होऊन आर्थिक चालना मिळत आहे. कार्बन उत्सर्जन कमी करणारे उत्तम साधन असल्याने पुणे शहर अधिक हरित (Green) होण्यास मदत होईल. तसेच, उर्वरित फेज-१ चे विस्तार आणि प्रस्तावित फेज-२ मार्गांचे काम पूर्ण झाल्यावर अखंड कनेक्टिव्हिटी मिळेल. पुणे मेट्रोचे हे यश महामेट्रोचे अभियंते, कर्मचारी आणि प्रशासनाचे परिश्रम तसेच पुणेकरांच्या सहकार्याचे प्रतीक आहे..

Follow Us On