Team My Pune City – पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी (Pune Metro) करण्याच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलले गेले असून माण-हिंजवडी ते शिवाजीनगर दरम्यान असलेल्या पुणे मेट्रो लाईन 3 प्रकल्पाचे 87 टक्के काम पूर्ण झाले आहे. उर्वरित काम अंतिम टप्प्यात असून या पार्श्वभूमीवर माण डेपो ते पीएमआर 4 स्थानकापर्यंत मेट्रोची पहिली चाचणी (ट्रायल रन) शुक्रवारी यशस्वीपणे पार पडली.
Kondhwa rape case : कोंढवा बलात्कार प्रकरणाला नवे वळण, पीडितेलाच घेतले पोलिसांनी ताब्यात
पुणे आयटी सिटी मेट्रो रेल लिमिटेड या प्रकल्पाची अंमलबजावणी पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (PMRDA), टाटा व सिमेन्स समूह यांच्या सार्वजनिक-खासगी भागीदारी (PPP) मॉडेल अंतर्गत केली जात आहे. 25 नोव्हेंबर 2021 रोजी या प्रकल्पाला सुरुवात झाली असून मार्च 2026 पर्यंत तो पूर्ण करण्याचे उद्दिष्ट आहे.
Pavana Dam : पवना धरणात दमदार पावसामुळे जलसाठ्यात मोठी वाढ – साठा 71 % वर
एकूण 23.3 किलोमीटर लांबीचा हा कॉरिडॉर 23 स्थानकांनी सज्ज असून विद्यमान मेट्रो मार्गांशी जोडणारे इंटरचेंज पॉईंट्सही असणार आहेत. या मार्गामुळे पुणे शहरातील वाढती लोकसंख्या आणि वाहनांची गर्दी लक्षात घेता जलद, सुरक्षित आणि पर्यावरणपूरक वाहतूक साधने मिळणार (Pune Metro) आहेत.
या प्रकल्पासाठी आलेल्या चार वातानुकूलित मेट्रो ट्रेन सेटमध्ये प्रत्येकी तीन डबे असून एकूण प्रवासी क्षमता अंदाजे 1 हजार आहे. या मेट्रो गाड्या ताशी 80 किमी वेगाने धावणार आहेत.
माण डेपो ते पीएमआर 4 स्थानकापर्यंत झालेली यशस्वी चाचणी हा मेट्रो लाईन 3 साठी अत्यंत महत्त्वाचा टप्पा ठरला आहे. विक्रमी वेळेत होणारे हे काम पुणेकरांसाठी लवकरच नव्या प्रवासाचा अनुभव घेऊन येणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेवर याचा सकारात्मक परिणाम होणार (Pune Metro) आहे.